HW News Marathi
Covid-19

देशात येत्या ६ ते ८ आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज

नवी दिल्ली। भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झालाय मात्र अशा परिस्थितीतही रुग्ण संख्या आणि मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. या अनुषंगाने संशोधकांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. या तिसऱ्या लाटेवर एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी आता इशारा दिला आहे.कोरोनाच्या नियमांची पायमल्ली केल्यास कोरोनाची तिसरी लाट दोन महिन्यात येऊ शकते, असा इशारा डायरेक्टर गुलेरिया यांनी दिला आहे .

एम्सच्या संचालकांनी म्हटलंय की आतापर्यंतच्या संशोधनात असे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत कोरोना ची तिसरी लाट जेष्ठांपेक्षा लहान मुलांना प्रभावित करेल. तर यापूर्वी भारतात तज्ञांनी पहिल्या वेळी सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत कोरोना ची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली होती मात्र एप्रिल आणि मे महिन्याच्या मध्यावधीत कोरोना ची दुसरी लाट भारतात पोहोचली होती यादरम्यान देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढले अशी आकडेवारी नोंदवण्यात आली होती. अशा महाभयंकर परिस्थितीत राज्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता देखील जाणवली आणि यानंतर काही दिवसातच रुग्णांची संख्या कमी व्हायला सुरुवात झाली.

एम्सच्या प्रमुखांनी पुढे सांगितले की, सामान्यत: नवीन लाट यायला तीन महिने लागू शकतात. परंतु नवीन लाटेला तीनच महिने लागतील हे आवश्यक नसते, कारण वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून खूप कमी वेळेतही हे घडू शकते. आपल्याला कोरोना प्रोटोकॉलशिवाय स्थितीवर काटेकोरपणे पाळत ठेवणे आवश्यक आहे. कारण आधीच्या लाटेत आम्हाला कोरोना व्हायरसचा एक नवीन प्रकार दिसला होता जो परदेशातून आपल्या देशात आला आणि येथे विकसित झाला. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हरिद्वारमधील कुंभमेळ्यासाठी भक्तांनी गंगा नदी काठी केली तोबा गर्दी

News Desk

देशातील ‘या’ राज्यात १९ जूनपासून लॉकडाऊन वाढवला

News Desk

निराधार, ज्येष्ठ, दिव्यांगांना ३ महिन्यांचे अनुदान आगाऊ मिळणार

News Desk