मुंबई | हे सरकार चोऱ्या करायला बसलेले आहे. यांना काय पडले उत्तर द्याचे हे सरकार उत्तर देत नाही, पेपर फुटी प्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर केली आहे. पडळकरांनी आज (२२ डिसेंबर) विधानपरिषदेत पेपर फुटी प्रकरणी सरकारवर टीका केली. यासंदर्भात एचडब्ल्यू मराठीशी बोलताना पडळकरांनी सरकारव हल्लाबोल केला आहे.
राज्य सरकारकडून समाधानकार उत्तर आले नाही, असा प्रश्न एच. डब्ल्यू मराठीच्या पत्रकारांनी विचरल्यावर ते म्हणाले, “राज्य सरकार काय समाधानकारक उत्तर देणार नाही. कारण हे रोज चोऱ्या करायला बसलेले सरकार आहे. या सरकारला काय पडले उत्तर द्याचे हे सरकार उत्तर देत नाही. हे सरकार संख्येच्या जोरावरती हे सर्व रेटून नेत आहेत,” असा आरोप पडळकरांनी सरकार केला आहे. पडळकर पुढे म्हणाले, “महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय ना. या परीक्षेत इतका घोटाळा झाला. टीईटी परीक्षेच्या प्रमुखाला अटक करण्यात आली. मोठ-मोठ्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली हे सर्वांजण सरकारशी जोडले जात आहेत. आणि आता सरकारने किती जरी पळायचा प्रयत्न केला तरी या परीक्षेच्या घोटाळ्यातून हे बाहेर पडलीत,” असे मला वाटत नाही.
“अत्यंत दुर्देवी ही गोष्ट आहे, महाराष्ट्रातील मुलांना कोरोनामुळे २ वर्ष परीक्षा नव्हत्या. परीक्षा घेण्यासाठी आधी आंदोलन करावे लागले. आणि राज्य सरकारने परीक्षा घेतल्या. तेव्हा त्यांनी अशा कंपन्यांना परीक्षा घ्याला सांगितल्या ज्या ब्लॅक लिस्ट आहेत. आणि त्या कंपन्या १०० टक्के फसवणूक करणाऱ्या कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांना हाताशी धरून यांचे कार्यकर्ते तिथे नोकरीवर बसवण्याची पॅलेन हे इथल्या सरकारच्या लोकांनी केले आहे. आणि म्हणून आरोप भरतीमध्ये सभागृहात आज चर्चा झाली. सभागृहात विरोधी पक्षनेते आणि आम्ही जो प्रश्न विचारला. त्याला आरोग्यमंत्र्यांनी उत्तर दिले नाही. आरोग्य मंत्र्यांनी फिरून फिरून उत्तर आणि दुर्देवी हेच्या पेक्षा की, सत्ताधारी आमदार सर्वजण त्यांच्या पाठिशी होते,” असे पडळकरांनी एचडब्ल्यू मराठीशी बोलताना म्हणाले.
पेपर फुटीचे प्रकरण सीबीआयकडे द्या
या राज्यातील लाखो मुलांच्या करिअरच्या प्रश्न त्यांच्या आयुष्याचा विषय आहे. त्या परीक्षेत घोटाळा झाला हे स्पष्ट दिसते आणि हे कोणी भाजपचे लोक बोलत नाही. हे सर्व पोलीस तपासात सिद्ध झाले आहे. पेपर कुठे फुटले, कसे आणि परीक्षा केंद्रावर काय घोळ झाला. आणि एकाच नंबरवर किती लोकांना सेंटर दिले. हे सर्व माहिती असताना तुम्ही पाठबळ देत असाल. सरकारचा यामध्ये संरक्षण आहे. आणि सरकारचे संरक्षण आसल्याशिवाय असा घोटाळा होऊ शकत नाही. म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. शंभर टक्के उमेदवारांनी नोकरी देतो, असा तुमचा जो न्यासाचा जो दलाल ऑडिओमध्ये काय बोलतोय. क वर्गासाठी १५ लाख रुपये, ड वर्गासाठी ८ लाख रुपये, दर सुरू आहे. आणि अमरावतीच्या २०० उमेदवारींनी त्यांना पैसे दिलेत. एका जिल्ह्यातील २०० उमेदवारांचे पैसे दिले असतील. तर याची व्यप्ती किती मोठी आहे. अखंड राज्यातील काय परिस्थिती असेल. म्हणून हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्र पोलीस कधीपर्यंत तपासेल. जिथपर्यंत अधिकारी आणि दलालांपर्यंत आहेत. तिथपर्यंत हे तपास करतील. हे प्रकरण मंत्र्यांपर्यंत जातय. म्हणून हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे, अशी आमची मागणी आहे, भाजप नेते गोपीचंद पडळकर एच. डब्ल्यू मराठीशी बोलताना म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.