HW News Marathi
अर्थसंकल्प

‘या नेत्याने’ तब्बल १० वेळा सादर केला अर्थसंकल्प , विक्रम आजही अबाधित …..

दिल्ली | अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्र्यांवर संपूर्ण देशाच्या नजर खिळलेल्या असतात. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री एकप्रकारचा रेकॉर्ड बनवत असतात. असाच एक रेकॉर्ड बनवला होता गुजरातचे काँग्रेसचे नेते आणि नंतर बिगरकाँग्रेस सरकारमध्ये प्रधानमंत्री राहिलेले मोरारजी देसाई यांनी ..

देशात आजपर्यंत सर्वात जास्त सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड गुजरातचे काँग्रेस नेते मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे . भारताचे ४ थे पंतप्रधान बनण्याआधी त्यांनी अर्थमंत्री म्हणून १० अर्थसंकल्प सादर केले होते . मोरारजीनंतर सर्वात जास्त अर्थसंकल्प सादर करण्याचा मान जातो तो माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याकडे .पी चिदंबरम यांनी आजपर्यंत ८ अर्थसंकल्प सादर केले आहेत, परंतु ते मोरारजींच्या विक्रम तोडू शकले नाहीत .

यंदाच्या वर्षी संसदीय अर्थसंकल्पाचे सत्र ३१ जानेवारी ला चालू होणार आहे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या कारकिर्दीतला सलग दुसरा अर्थसंकल्प सादर करणार आहेत .

मोरारजी देसाई केव्हा अर्थमंत्री होते ?

माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा जन्म गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील खेड्यात 29 फेब्रुवारी 1896 रोजी झाला होता. मोरारजी देसाई हे पहिल्यांदा 13 मार्च 1958 ते 29 ऑगस्ट 1963 पर्यंत देशाचे अर्थमंत्री होते. त्यानंतर मार्च 1967 ते जुलै 1969 पर्यंत त्यांनी पुन्हा अर्थमंत्र्यांचा कार्यभार स्वीकारला. या दरम्यान त्यांनी संसदेसाठी केंद्राचे 10 अर्थसंकल्प सादर केले, त्यापैकी आठ पूर्ण बजेट होते, तर दोन अंतरिम बजेट होती.

1964 आणि 1968 या काळात असे काही प्रसंग होते जेव्हा मोरारजी देसाई यांनी त्यांच्या वाढदिवशी संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला होता. देशात पहिल्यांदा 1977 मध्ये स्थापन झालेल्या बिगर-कॉंग्रेसच्या सरकारमध्ये मोरारजी देसाई पहिल्यांदाच पंतप्रधान झाले. 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979 पर्यंत ते देशाचे पंतप्रधान होते.

चिदंबरम यांनी बजेट कधी सादर केले?

चार वेळा अर्थमंत्री असलेले अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी संसदेत एकूण आठ अंदाजपत्रके मांडली. एचडी देवगौडा यांच्या नेतृत्वात संयुक्त मोर्चाच्या सरकारमध्ये चिदंबरम पहिल्यांदाच 1 जून 1996 रोजी अर्थमंत्री झाले. 21 एप्रिल 1997 पर्यंत ते अर्थमंत्री राहिले. यानंतर 1 मे 1997 पासून ते 19 मार्च 1998 पर्यंत तत्कालीन पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते.

त्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए -1) सरकारमध्ये चिदंबरम 22 मे 2004 ते 30 नोव्हेंबर 2008 पर्यंत अर्थमंत्री होते. चिदंबरम हे 31 जुलै 2012 ते 26 मे 2014 या काळात चौथ्यांदा मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात यूपीए -२ मधील अर्थमंत्री होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

PFB : आता आयकरात ५ लाख रुपयापर्यंतची सूट वाढवणार का ?

News Desk

Budget 2019 : २० रुपयांचे नवे नाणे, तर १ ते १० रुपयांचे नाणे नव्या रुपात येणार

News Desk

#Budget2019 :अंतरिम अर्थसंकल्पाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

News Desk