HW News Marathi
अर्थसंकल्प

PFB : आता आयकरात ५ लाख रुपयापर्यंतची सूट वाढवणार का ?

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा फेब्रुवारी महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यानंतर लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजणार आहे. या अंतरिम अर्थसंकल्पात मोदी सरकार मताच्या राजकारणासाठी लोकप्रिय घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये केंद्र सरकार आयकर सवलतीची मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढविणार असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आयकर सवलतीची मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढविणार असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण देताना वार्षिक उत्पन्‍नाची मर्यादा केंद्राने ८ लाख निश्‍चित केली आहे. त्यामुळे या उत्पन्नाच्या मर्यादेपर्यंत आयकर का माफ करत नाही, असा सवाल आता केला जात आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Budget 2019 : २० रुपयांचे नवे नाणे, तर १ ते १० रुपयांचे नाणे नव्या रुपात येणार

News Desk

Budget2019 : निर्मला सीतारामन यांनी मोडला इतिहास, ‘बजेट ब्रिफकेस’ऐवजी लाल रंगाच्या चोपड्यात

News Desk

PFB : मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्प अधिवेशनाची तारीख जाहीर

News Desk