HW News Marathi
महाराष्ट्र

मी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा…

नागपूर | “आपण अध्यक्षांच्या खुर्चीवर बसल्यानंतर एवढी आक्रमकता योग्य नसते. संयमाने आपण वागावे, असा सल्ला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना दिला आहे. यावर बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की, ” मी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा माझाही स्वभाव असाच होता. मी अंगावर जायचो. मग मी स्वत:ला समजावले, आपण मुख्यमंत्री आहे, हे आपले काम नाही. “

नाना पटोले राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावाचे निवेदन वाचत होते. चर्चेचा आजचा शेवटचा दिवस असल्यचे त्यांनी नमूद केले. यावर बोलण्यासाठी फडणवीस आणि मुनगंटीवार दोघेही उभे राहिले. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले म्हटले की, तुम्ही दोघांपैकी कोणीतरी एकाने बोलवे, त्यावेळी फडणीस म्हणाले की, पॉईंट ऑफ ऑर्डर कोणीही सदस्य घेऊ शकतो, त्यावर बंदी घालता येत नाही.

फडणवीस पुढे म्हणाले की, “अध्यक्ष महोदय आपण ज्येष्ठ आहात, अध्यक्षांनी थोडा जास्त संयम ठेवावा. आपण संयमी आहात, पण अध्यक्षांनी जास्त संयम दाखवायचा असतो. मी पण जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, तेव्हा माझाही स्वभाव असाच होता, मी अंगावर जायचो. मग मी स्वत:ला समजावले, आपण मुख्यमंत्री आहे, हे आपले काम नाही. आपण संयमाने वागले पाहिजे, मग मी संयमाने वागायला लागलो. तसे आपणही आक्रमक आहात. पण आपण अध्यक्षांच्या खुर्चीवर बसल्यानंतर एवढी आक्रमकता योग्य नसते. संयमाने आपण वागावे अशी हात जोडून विनंती आहे, असं देवेंद्र फडणवीस नाना पटोले यांना म्हणाले. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज (१८ डिसेंबर) दिवस असून केंद्राचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा तातडीने राज्यात लागू करण्याची मागणी माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. मात्र, यावरून सभागृहात गदारोळानंतर १० मिनिटासाठी विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यता आली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात वीज पडून नऊ जण ठार

News Desk

“होय, शिवसेना गुंडगिरी करते, आम्ही सर्टिफाईड गुंड”,संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं!

News Desk

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Manasi Devkar