HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

पीएम केअर फंडाला मदत करा असे सांगणारे महाराष्ट्र द्रोही आहेत

मुंबई | कोरोनाच्या या कठीण काळात राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली. पुढच्या महिन्यात पगार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला कर्ज काढण्याची वेळ पडेल अशी परिस्थिती आहे. मात्र जे कोरोनासाठी काम करत आहेत त्यांचा पगार व्यवस्थित होईल. परंतु इतरांबाबत थोडेसे मागे पुढे होऊ शकते. चार महत्वाचे विभाग वगळता इतर विभागांमध्ये काटछाट करण्याची वेळ येऊ शकते, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

यावर्षी देखील सारथी संस्थेसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सारथी बद्दल गैरसमज पसरवून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले.

केंद्र सरकारकडून कोणतीही मदत झालेली नाही, असेही ते म्हणाले. पीएम केअर फंडाला मदत करा असे सांगणारे महाराष्ट्र द्रोही आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे अजुनही सत्ता गेल्याच्या शॉकमधून बाहेर येऊ शकलेले नाहीत, असा टोलाही त्यांनी विरोधी पक्षाला लगावला आहे.

Related posts

महापौरांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मांडली पुण्यातील कोरोनास्थिती

Gauri Tilekar

माझे सध्या वाईट दिवस, चांगले काम करताना त्रास होतो !

अपर्णा गोतपागर

…तर आमचे स्वतंत्र अस्तित्व उरणारच नाही !

News Desk