HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र

शिवसेना भवनमध्ये आणखी ३ जणांना कोरोनाची लागण, तर निर्जंतुकीकरण करून केले सील

मुंबई | शिवसेना भवनात कार्यालयीन काम पाहणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या तिघांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या या तिघांवर उपचार सुरू आहेत. तसेच या तिन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सेनाभवन निर्जंतुकीकरण करून सील करण्यात आले आहे.

तसेच सेना भवनातील सर्व गाळे आणि कार्यालये बंद करण्यात आले असून सर्व सामान्यांना सेना भवनात प्रवेशास सक्त मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, १९ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते दिवाकर रावते, संजय राऊत, महापौर किशोरी पेडणेकर आणि विशाखा राऊत शिवसेना भवनात गेले होते. त्यावेळी हे तिन्ही कर्मचारी तिथे कार्यरत होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

Related posts

दिल्ली-पुणे विमानात कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण, पुण्यात उपचार सुरु

अपर्णा गोतपागर

बँक कर्मचाऱ्यांकडून सलग तीन दिवसीय संप

News Desk

आता सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे बंधनकारक !

News Desk