HW News Marathi
Covid-19

सिरमचा ५० लाख लसी युकेला पाठवण्याचा प्रस्ताव मोदी सरकारने फेटाळला

नवी दिल्ली | संपूर्ण देशात सध्या कोरोना लसीवरुन राजकारण पेटले आहे. लसीचा तुटवडा लोकांना एकीकडे भासत असताना दुसरीकडे मात्र यावरुन राजकारण सुरु आहे. अशात कोविशिल्ड लसीचे ५० लाख डोस युकेला पाठवण्याचा सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला आहे. आंतरराष्ट्रीय दबाव तसंच वाटाघाटी करण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतरही केंद्र सरकारने सिरमची विनंती फेटाळून लावली आहे.

भारताला सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण मोहिमेलाही धक्का बसला आहे. यामुळे देशात निर्माण होणाऱ्या लसींचा पुरवठा सर्वात आधी राज्यांना केला जावा आणि त्यानंतरच निर्यातीला परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सिरमला परवानगी नाकारण्यात आली आहे.

राज्यांना त्यांच्या मागणीनुसार पुरवठा व्हावा यासाठी सिरमशी संपर्क साधण्यास सांगण्यात आलं आहे. देशात सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण केलं जात असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यांकडून मागणी होत आहे.

“कोविशिल्ड लसीचे हे ५० लाख डोस आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी उपलब्ध आहेत. राज्यांना हे डोस मिळवण्यास सागंण्यात आलं आहे. खासगी रुग्णालयंदेखील हे लसीचे डोस मिळवू शकतात,” असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात पुन्हा एकदा ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला

News Desk

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा घेऊ नका, अमित देशमुख यांची सूचना

News Desk

लहान मुलांचं सप्टेंबरपासून लसीकरण होणार?

News Desk