HW News Marathi
Covid-19

बीडमध्ये तिहेरी हत्याकांड ! आईसह दोन मुलांचा निर्घृण हत्या

बीड | शहरातील शुक्रवार पेठ भागात आज (२४ मे) भर दुपारी ३ जणांची हत्या झाल्याची घटना उघडकीस असून या घटनेने जिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. बीड शहरातील पेठ बीड भागात आज दुपारी तिघांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संगीता संतोष कोकणे ( वय 31 ) , संदेश संतोष कोकणे ( अंदाजे वय 10 ) या दोन्ही माय लेकाचे मृतदेह एका खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले तर मयूर संतोष कोकणे ( वय 7 ) याचा मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये आढळून आला आहे.

पेठ बीड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत . सदरील खुनाचे कारण अद्याप समजू शकले नसून हा प्रकार कौटुंबिक वादातून झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असून चौकशी नंतरच खरा प्रकार समोर येईल असे सूत्रांनी सांगितले . दरम्यान मयत महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेल्याचे समजते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीड जिल्ह्यात ८ नवे कोरोनाबाधित, सर्वच जण मुंबई-पुण्याहून आलेले

News Desk

देशात कोरोना संख्या वाढतीच, २४ तासांत ५५,०७९ नवे रुग्ण

News Desk

केरळात कोरोना रुग्णांमध्ये वाढ!

News Desk