HW News Marathi
महाराष्ट्र

अमृता फडणवीसांच्या कार्यक्रमासाठी पोलीस विकतायंत तिकिटे

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि हौशी गायिका अमृता फडणवीस यांचा सहभाग असलेला सांस्कृतिक कार्यक्रम स्वातंत्र्यदिनोत्तर संध्येला अर्थात बुधवारी औरंगाबादेत आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गृहखात्याच्याही नाड्या आपल्या हातात ठेवून असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसाठी अवघे पोलीस खाते कामाला लागले आहे. गुन्हेगारांच्या बोबड्या वळविणारी खाकी या कार्यक्रमासाठी चक्क बस कंडक्टरच्या खाकीसारखे तिकिटे फाडण्याची कामे करू लागली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

विशेष म्हणजे महात्मा गांधी मिशनतर्फे (एमजीएम) आयोजित या कार्यक्रमासाठी कोणतेही तिकीट आकारण्यात आलेले नाही. तसेच या ‘एमजीएमचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कमल किशोर कदम आहेत. कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना भारतीय स्वातंत्र्यअशी असून त्यात अमृता फडणवीस यांच्यासह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मिथुन, गजेंद्र वर्मा, मोहम्मद इरफान,युविका चौधरी आदी कलाकार सहभागी होणार असल्याचे कळते.

कार्यक्रम विनामूल्य असूनही हजारो रुपयांच्याविशेष प्रवेशिका निवडक २०० व्यक्तींसाठीच तयार करण्याआल्या आहेत. यातून जमा होणारा निधी कर्करुग्णांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांच्या मुलांना आर्थिक मदत म्हणून दिला जाणार असल्याचे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत पोलिसांनी तसेच आयोजकांनी कमालीची गोपनीयता राखली आहे. सामाजिक दायित्व निधीतून उद्योजकांनी याकार्यक्रमाच्या प्रवेशिका घ्याव्यात, असा आग्रह पोलिसांकडून केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारकडून आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगाऱ्यांना मिळणार पेन्शन

News Desk

वाढीव वीज बिलाच्या मुद्यावर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार

News Desk

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

News Desk