HW News Marathi
महाराष्ट्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

मुंबई । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या मातोश्रीला देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळते. दरम्यान, राज ठाकरे आणि त्यांच्या आई दोघांनाही कोरोनाची सौम्य लक्षणं असल्याने ते घरातच उपचार घेत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती समोर येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या मनसेने कंबर कसली असून अनेक ठिकाणी पक्षाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, त्यापैकी २ मेळावे नुकतेच रद्द करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंची प्रकृती ठीक नसल्याचं वृत्त होतं. त्यामुळेच, मनसेचे २ मेळावे देखील अचानक रद्द करण्यात आले होते. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली होती. मात्र, अधिकृतपणे पक्षाकडून हे कारण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे, अनेक चर्चाही रंगल्या. राज यांना कोरोनाची लक्षणं जाणवल्याने चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परंतु, लक्षणं सौम्य असल्याने राज आणि त्यांच्या आई आपल्या राहत्या घरी उपचार घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाटकांच्या माध्यमातून मिळते आनंदाची अनुभूती! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

मी आणि फडणवीस यापुढेही भेटत राहणार!

News Desk

माजी खासदार किरीट सोमय्या आज बीडमध्ये; पत्रकार परिषदेकडे लक्ष

News Desk