HW News Marathi
महाराष्ट्र

Hw Exclusive | टिकटाॅकपेक्षा भारत महत्वाचा, टिकटाॅकस्टार गुलिगत

बीड | भारत चीन यांच्यात सुरू आलेल्या वादात भर पडत चालली आहे. अशातच भारताने चीनवर डिजिटल स्ट्राईक करत ५९ ॲपवर बंदी घातली. यात टिक टॉक ॲप बंद केल्याने अनेक जण बेरोजगार झाले आहेत. अशातच, टिक टॉकवर धुमाकूळ घालणाऱ्या गुलिगतलाही या बंदीमुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

गुलिगत फेम सूरज चव्हाण याने टिक टॉक बंद झाल्याने करमत नसल्याचे म्हटले आहे. एच. डब्ल्यू मराठीचे आमचे प्रतिनिधी हेमंत गडकरी यांच्याशी बोलताना त्याने त्याच्या कुटुंबाविषयी माहिती दिली. लहानपणी त्याचे आई वडील वारले आणि त्याला ५ बहिणी आहेत. इतके दिवस टिक टॉक सुरू असताना लोकं भेटायला येत होते. मात्र, आता बंद झाल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

टिक टॉकवर सुरजचे १.५ मिलियन फॉलोवर्स आहेत. मात्र भारत आणि चीन यांचे संबंध बिघडले आणि गरीब घरातल्या सुरजवर बेरोजगार होण्याची वेळ आलीये आणि आता पुढे काय करावं हा मोठा प्रश्न सुरज चव्हाणला पडला आहे. सुरज फक्त ८ वी पर्यंत शिकला आहे आणि त्याला लिहीता वाचतां येत नाही. टिक टॉक जरी बंद झालं तरी भारत महत्त्वाचा आहे असं सूरजने एच डब्ल्यू मराठीशी बोलताना म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

Aprna

संजय राऊतांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, तर परबदेखील निशाण्यावर!

News Desk

राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असतील तर राजभवनात जाऊन सांगावं लागेल, राऊतांचा पाटलांना टोला

News Desk