मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील २१दिवसांचा लॉकडाऊन हा ३ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. मोदींनी आज (१४ एप्रिल) देशवासीयांना संबोधित केले आहे. जनतेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, २० एप्रिलपर्यंत कोरोना लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. २० एप्रिलपर्यंत कोरोना हॉटस्पॉट वाढले नाही तर काही भागातील नियम शिथील करण्यात येतील, असा मोदींनी स्पष्ट केले आहे.
Till 20th April, all districts, localities, states will be closely monitored, as to how strictly they are implementing norms. States which will not let hotspots increase, they could be allowed to let some important activities resume, but with certain conditions: PM Modi pic.twitter.com/tL2YOBxe7u
— ANI (@ANI) April 14, 2020
दरम्यान, देशातील २० एप्रिलपर्यंत प्रत्येक राज्य, जिल्हे, शहर यांचे मूल्यांकन, ज्या क्षेत्रांनी आपले हॉटस्पॉट वाढू दिलेले नाही ज्या राज्यात करोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतील तिथले नियम शिथील केले जातील, असे मोदींनी संबोधित करताना म्हणाले. जगभरातील बड्या बड्या राष्ट्रांची स्थिती पाहिल्यास भारताची स्थिती खूप नियंत्रणात आहे, असे सुद्धा मोदींनी स्पष्ट केले आहे.
आज देशातील करोनाबाधितांची संख्या १०३६३ वर पोहचली आहे. यामध्ये ७६ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. यातील सध्या ८९८८ रुग्णांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. करोनामुळे ३३९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत तर १०३६ जणांवर उपचार यशस्वी ठरलेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.