HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

राज्यात आज ३ हजार ६४५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई | राज्यात दररोज वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या अनेक दिवसांपासून नियंत्रणात असल्याचे एक दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२६ ऑक्टोबर) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार ६४५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे याच एका दिवसात ९ हजार ९०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण तब्बल १४ लाख ७० हजार ६६० रुग्ण बरे होऊन रुग्णालयांतून घरी पाठविण्यात आले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यातील विविध रुग्णालयांत एकूण १ लाख ३४ हजार १३७ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. महाराष्ट्रात कोरोनामुक्तांचा आकडा सातत्याने वाढत असून सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.२% इतके झाले आहे.

Related posts

फडणवीस आणि मी एकत्र येणार म्हटलं, की लगेच ब्रेकिंग न्युज – अजित पवार

News Desk

कर्जमाफीच्या रकमेसाठी शेतक-यांना दिवाळीची वाट पहावी लागणार

News Desk

पंतप्रधानांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सलग २ दिवस होणार चर्चा 

News Desk