HW News Marathi
देश / विदेश

राज्यात आज ३९४ नवीन रुग्णांची नोंद, एकूण आकडा ६८१७

मुंबई | राज्यात आज (२४ एप्रिल) ३९४ नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्याची एकूण रुग्ण संख्या ६८१७ झाली आहे. आज ११७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ९५७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २ हजार १८९ नमुन्यांपैकी ९४ हजार ४८५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६८१७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १९ हजार १६१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८,८१४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३०१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ११, पुणे येथे ५ तर मालेगाव येथे २ मृत्यू झाले आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी १२ पुरुष तर ६ महिला आहेत. आज झालेल्या १८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत तर ६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १८ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई मनपा : ४४४७ (१७८)

ठाणे: ३५ (२)

ठाणे मनपा: २२० (४)

नवी मुंबई मनपा: १२५ (४)

कल्याण डोंबिवली मनपा: १३१ (३)

उल्हासनगर मनपा: २

भिवंडी निजामपूर मनपा: १२

मीरा भाईंदर मनपा: ११८ (२)

पालघर: २१ (१)

वसई विरार मनपा: ११४ (३)

रायगड: १४

पनवेल मनपा: ४० (१)

ठाणे मंडळ एकूण: ५२७९ (१९८)

नाशिक: ४

नाशिक मनपा: ७

मालेगाव मनपा: ११६ (११)

अहमदनगर: २५ (२)

अहमदनगर मनपा: ८

धुळे: ६ (१)

धुळे मनपा: १६ (१)

जळगाव: ६ (१)

जळगाव मनपा: २ (१)

नंदूरबार: ७ (१)

नाशिक मंडळ एकूण: १९७ (१८)

पुणे: ४३ (२)

पुणे मनपा: ८४८ (६३)

पिंपरी चिंचवड मनपा: ७० (२)

सोलापूर: १

सोलापूर मनपा: ३८ (३)

सातारा: २० (२)

पुणे मंडळ एकूण: १०२० (७२)

कोल्हापूर: ७

कोल्हापूर मनपा: ३

सांगली: २५

सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)

सिंधुदुर्ग: १

रत्नागिरी: ८ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ४५ (२)

औरंगाबाद:०

औरंगाबाद मनपा: ४२ (५)

जालना: २

हिंगोली: ७

परभणी: ०

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ५२(५)

लातूर: ९

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ०

नांदेड मनपा: १

लातूर मंडळ एकूण: १४

अकोला: ११ (१)

अकोला मनपा: १२

अमरावती: ०

अमरावती मनपा: १३ (१)

यवतमाळ: २३

बुलढाणा: २१ (१)

वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: ८१ (३)

नागपूर: २

नागपूर मनपा: ९९ (१)

वर्धा: ०

भंडारा: ०

गोंदिया: १

चंद्रपूर: ०

चंद्रपूर मनपा: २

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: १०४ (१)

इतर राज्ये: २५ (२)

एकूण: ६८१७ (३०१)

सध्या राज्यातील कोरोना आजाराचा मृत्यूदर हा ४.४ टक्के आहे. राज्यातील २६९ मृत्यूंचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता ५० वर्षांखालील व्यक्तींचा मृत्यूदर हा कमी आढळून येतो, विशेषतः २१ ते ३० वर्षे वयोगटात मृत्यूदर ०.६४ टक्के इतका आहे तर त्यापुढील वयोगटात मृत्यूदर वाढताना दिसून येतो. ६१ ते ७० या वयोगटात मृत्यूदर सर्वाधिक म्हणजे १७.७८ टक्के एवढा आहे . यामुळे ५० वर्षांवरील आणि इतर अतिजोखमीचे आजार असणा-या व्यक्तीमध्ये कोरोना आजारामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असल्याचे अधोरेखित झाले आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ५१२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ७७०२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २८.८८ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात १९७७ ची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही | शरद पवार

News Desk

सरकारने शेतकऱ्यांविरोधात ‘सेलिब्रिटीज्’ना उतरवले, संजय राऊतांचा केंद्रावर हल्ला

News Desk

गुजरात विधानसभेत राडा, काँग्रेस आमदारानं भाजप आमदाराला पट्ट्यानं मारहान

News Desk