HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज होणार सादर

मुंबई। राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभराच्या सत्तासंघर्ष होता. यानंतर राज्यसह देशात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या वेगळ्या विचार धारा एकत्र येवून महाविकासआघाडी आघाडीचे सरकार स्थापन झाले. या महाविकासआघाडीचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे सरकारचा आज (५ मार्च) पहिला अर्थसंकल्प विधीमंडळ सादर होणार आहे. हा पहिला अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर होणार आहे.

राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान काल (5 मार्च) राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला. यानुसार राज्याचा जीडीपी ५.७ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अर्थराज्यमंत्री शंभुराजे देसाई विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडतील.

दरम्यान अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सकाळी १०.३० वाजता कॅबिनेट बैठक बोलावली असून त्यात अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाईल. त्यानंतर अजित पवार सभागृहात अर्थसंकल्प सादर करतील. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन केले. याआधी अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये अर्थसंकल्प सादर केला होता. ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जुने व्हायरस परत आलेत, त्यांचा बंदोबस्त करायचाय”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा!

News Desk

राज्यपाल भाजप नेत्यांना भेटले, पण महाविकासआघाडीच्या नेत्यांसोबतची भेट टाळली ?

News Desk

पेट्रोल ६ पैशांनी तर डिझेल १९ पैशांनी वाढले

News Desk