HW News Marathi
महाराष्ट्र

साताऱ्यात ऐतिहासिक भवानी तलवारीची मिरवणूक

सातारा | आज दसऱ्यानिमित्त सातारा शहरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक भवानी तलवारीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. पारंपारिक विधिवत पूजन झाल्यानंतर या भवानी तलवारीच्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. सातारा जिल्ह्यातील नागरिक दरवर्षी मोठ्या उत्साहात या भव्य सोहळ्यात सहभागी होतात.

सातारा जिल्ह्यात प्रतिवर्षी होणारे सीमोल्लंघन आणि शस्त्रपूजन सोहळा गुरुवारी १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वा. जलमंदिर पॅलेस, सातारा येथे होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते विधिवत धार्मिक विधी पार पडल्यावर सातार्‍यात आज ऐतिहासिक श्री भवानी तलवारीची मिरवणूक निघणार आहे. या शाही मिरवणुकीसाठी साताऱ्यातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ सज्ज झाले आहेत.

धार्मिक विधी पार पडल्यावर पालखीमधून श्री भवानी तलवारीची मिरवणूक जलमंदिर पॅलेस येथून निघणार आहे. शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तेथे उभारण्यात येणार्‍या पूजा मंडपामध्ये खा. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते त्याठिकाणी सीमोल्लंघन केल्यावर पुन्हा त्याच मार्गावरुन भवानी तलवारीची मिरवणूक जलमंदिर येथे पोहचेल. जलमंदिर येथे विधिवत पूजन झाल्यावर खा. उदयनराजे भोसले आणि राजघराण्यातील मान्यवर व्यक्ती, सोनेरुपी आपटयांच्या पानाचा जलमंदिर पॅलेस येथील श्री तुळजाभवानी मंदिरात स्वीकार करतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चांगलं काम करणाऱ्यालाच तिकीट; राज ठाकरेंनी घेतली शाखाध्यक्षांची शाळा!

News Desk

किरीट सोमय्या यांचा हसन मुश्रीफांवर शेकडो कोटी घोटाळ्याचा आरोप!

News Desk

“लहान माझी बाहुली तिची मोठी सावली”, पंकजा मुंडेंचे बहिणीच्या वाढदिवशी खास ट्विट

News Desk