HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

राज्याची चिंता अधिकच वाढली ! आज नव्या कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांजवळ

मुंबई | राज्यात अक्षरशः कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. नव्या कोरोनाबाधितांचा आकडा धडकी भरवणारा ठरत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांबाबत आज (७ एप्रिल) जारी झालेल्या आकडेवारीनुसार,नव्या कोरोनाबाधितांचा राज्यातील आकडा तब्बल ६० हजारांच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल ५९,९०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसांत कोरोनामुळे राज्यात तब्बल ३२२ जणांनी आपला जीव गमावला आहे. एकीकडे वाढत्या कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेता राज्य सरकारने लावल्या विकेंड लॉकडाऊन आणि निर्बंधांना सर्वसामान्य आणि विरोधकांकडून कडाडून विरोध होत असताना दुसरीकडे राज्यातील कोरोनास्थिती अधिकच चिंताजनक होत चालली आहे.

राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा एकीकडे ६० हजारांच्या जवळपास गेला आहे. तर, दुसरीकडे आज नवीन ३० हजार 296 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण २६ लाख १३ हजार ६२७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर राज्यात सद्यस्थितीत एकूण ५ लाख १ हजार ५५९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.36% झाले आहे.

कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत किंवा लॉकडाऊन करावे अशी इच्छा नव्हती !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले कि, “कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत किंवा लॉकडाऊन करावे अशी इच्छा नव्हती. याआधीपासून सर्व जनतेला सावध करत होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये काही शेकड्यांमध्ये रुग्णसंख्या खाली आणली होती. कोणत्याही राज्याने केली नसेल अशा सुविधा निर्माण केल्या. पण या सुविधाही अपुऱ्या पडण्याची वेळ येईल, अशी स्थिती येण्याची शक्यता आहे. लसीकरण सुरु झाले. पण लसींचा साठाही आता संपून जाणार आहे. लसीचा साठा संपू लागला आहे. नव्या लाटेत आता तरूण वर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात बाधित होऊ लागला आहे. कारण तो रोजगार, कामांसाठी फिरतो आहे. लक्षण नसलेल्यांची संख्या ७० टक्क्यांहून अधिक आहे. त्यांच्यामुळे इतर अनेक बाधित होण्याची शक्यता आहे.”

Related posts

“व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने आम्ही ७ नगरेसवक उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवतोय” – नितेश  राणे

News Desk

जाणून घ्या… नवनीत राणा यांच्या अमित शहा भेटीमागचे कारण

News Desk

भारनियमनाविरोधात राष्ट्रवादीचा‘कंदील मेणबत्ती’ मोर्चा

News Desk