HW News Marathi
महाराष्ट्र

“उद्या कदाचित मला ईडीची नोटीस येईल”

नवी मुंबई | ईडीच्या माध्यमातून भाजप विरोधकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार आज (५ जानेवारी) पहाटे ४ वाजता नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी माथाडी कामगार तसंच व्यापाऱ्यांशी चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारने राज्य सरकारवर कृषी कायदा लादला आहे, मात्र राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल असं यावेळी त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.

सध्या राज्यात सरकारमधील काही नेत्यांना ईडी नोटीस बजावत आहे. नुकतंच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील नोटीस पाठवली. यावर विचारले असता रोहित पवार म्हणाले की, “नोटीस भाजपच्या लोकांना नाही तर फक्त विरोधकांना आल्या आहेत. भाजपच्या विरोधकांना नोटीस आल्या आहेत त्याच्यावरुनच समजून घ्या की ईडीचा वापर कशा पद्धतीने होत आहे. उद्या कदाचित मला ईडीची नोटीस येईल.”

“सर्वसामान्यांना सुद्ध आता ईडीसारखी संस्था गेल्या पाच वर्षात फक्त राजकीय हेतूने वापरली जात असल्याचं लक्षात आलं आहे. इतकी मोठी संस्था फक्त राजकीय दृष्टीकोनातून वापरली जात जात आहे. त्यात काही निष्पन्न होत नाही,” असं रोहित पवार यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजब सरकारचे गजब फर्मान; म्हणे,कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा

swarit

आम्हाला लोकसभा निवडणुकीची चिंता नाही | शरद पवार

swarit

शरद पवारांना सरकार चालवण्याचा दांडगा अनुभव ,सामनातून राष्ट्रवादीचे कौतुक तर काॅंग्रेसवर टीका

News Desk