HW News Marathi
महाराष्ट्र

काकांच्या पावलावर रोहीत पवारांचे पाऊल, ४ वाजताच APMC पोहोचले मार्केटमध्ये

नवी मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका आणि कामाची पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ज्या प्रकारे अगदी भल्या पहाटे ६ वाजताच अजितदादा मेट्रोची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते, त्याच स्टाईलने त्यांचा पुतण्या आणि आमदार रोहित पवार यांनी नवी मुंबईचे एमपीएमसी मार्केट गाठले. पहाटे ४ वाजता रोहित पवार हे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये पोहोचले होते. रोहित पवार यांनी आज (५ जानेवारी) भल्या पहाटे ४ वाजता एपीएमसीमधील भाजी व फळ मार्केटचा दौरा केला.

यावेळी रोहित पवार एपीएमसीमधील व्यापारी तसंच काही शेतकऱ्यांशी चर्चा करत एपीएमसी मधील यंत्रणा समजून घेण्याचा प्रयत्न केला. रोहित यांनी ठिकठिकाणी थांबून व्यापारी आणि शेतकऱ्यांची विचारपूस केली.

शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना एपीएमसीमध्ये येणाऱ्या अडचणी येत्या अधिवेशनात ते मांडणार आहेत. यावेळी रोहित पवार यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीकडून सुरू असणाऱ्या चौकशीवर आणि औरंगाबादच्या नामांतरावर ही भाष्य केले आहे. रोहित पवार यांच्या अचानक नवी मुंबईच्या भेटीमुळे महापालिका निवडणुकांमध्ये रोहित पवार सक्रिय होणार असल्याचे ही संकेत दिले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘काही लोकांच्या मनातील रोगही दूर कर’, छगन भुजबळांचं गणरायाकडे साकडं

News Desk

भाजपच्या हर्षवर्धन पाटलांनी घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट, राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण

News Desk

रोहित पवारांनी उपस्थित केला भाजपच्या संस्कारांवर प्रश्न!

News Desk