HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात ४५ कोरोना बाधित, तर देशात १६६ रुग्णांची संख्या

मुंबई। राज्यात कोरोननाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४५वर पोहचली गेली आहे. कालपर्यंत (१९ मार्च) मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येक एक-एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे देशात कोरोना रुग्णांची संख्या १६६ वर गेली आहे. तर राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४५ वर पोहोचली आहे. यात ४२ हे भारतीय, ३ परदेश अशी मिळून राज्यात आता कोरोनाचा आकडा ४५ वर गेला आहे. तसेच फक्त एकट्या पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण ११ रुग्ण कोरोना बाधित आहेत, तर मुंबईत एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ८ वर पोहोचला आहे.

पिंपरी चिंचवडमधील २१ वर्षीय तरुणाने गेल्या काही दिवसात फिलिपाईन्स, सिंगापूर आणि कोलंबो असा प्रवास केला होता. रत्नागिरीतील ५० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे, या व्यक्तीने दुबई प्रवास केला होता. तर अमेरिकेहून आलेल्या कोरोनाबाधीत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या मुंबईतील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळली आहे.

राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज निम्मे कर्मचारी येतील, या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील. तसेच रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

आजपासून तीन ठिकाणी कोरोनाची तपासणी होणार

राज्यात आजपासून (१९ मार्च) जे. जे. रुग्णालय, केईएम रुग्णालय आणि बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाचा तपासणी होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल(१८ मार्च) पुणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. आठ ठिकाणी नवीन तपासणी लॅब सुरु करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. या नव्या लॅबसाठी एनआयव्हीकडून उपकरण मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अनिल परब उद्योग करत बसतात’, निलेश राणेंची पुन्हा एकदा टीका!

News Desk

भाजपात ‘संघजिहाद’ पद्धत सुरु झाली आहे का ? | सचिन सावंत

News Desk

वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात चोरी, आज दर्शनासाठी मंदिर बंद

News Desk