HW News Marathi
देश / विदेश

चिंताजनक ! राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखाच्या पार

मुंबई। राज्यात आज ३ हजार ४९३ नवीन कोरोनाची नोंद झाली आहे. आता देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने १ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यासह राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १ हजार १४१वर पोहोचली आहे. राज्यात आज १७१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार ७९६ झाली आहे. दरम्यान, सध्या राज्यात ४९ हजार ६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१२ जून) दिली.

राज्यात सध्या ५३ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९५ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख २४ हजार ९७७ नमुन्यांपैकी १ लाख ०१ हजार १४१ नमुने पॉझिटिव्ह (१६.१८ टक्के ) आले आहेत राज्यात ५ लाख ७९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५५३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ६७ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार २०० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ४७.३ टक्के एवढे आहे.

● राज्यातील मृत्यू दर – ३.७ टक्के

राज्यात आज १२७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- १०६ (मुंबई ९०, ठाणे ११, कल्याण-डोंबिवली ३, मीरा-भाईंदर १, वसई-विरार १), नाशिक- ३ (नाशिक २, धुळे १), पुणे- १२ (पुणे १२), कोल्हापूर-३ (सांगली ३), औरंगाबाद-२ (औरंगाबाद २), अकोला -१ (अमरावती १).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ९२ पुरुष तर ३५ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६७ रुग्ण आहेत तर ५२ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या १२७ रुग्णांपैकी ८९ जणांमध्ये (७० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३७१७ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २० मे ते ९ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७७ मृत्यूंपैकी मुंबई ५५, ठाणे -१०, सांगली -३, कल्याण डोंबिवली – २,पुणे -२, मीरा भाईंदर – १, वसई विरार – १, नाशिक -१, धुळे -१आणि अमरावती – १ मृत्यू असे आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अधीर रंजनची अभी ज्यादा हो रहा है…” मोदी लोकसभेत भडकले

News Desk

#NirbhayaCase : जाणून… घ्या ‘निर्भया’च्या केसचा ७ वर्षे ३ महिन्याचा कायदेशीर घटनाक्रम

swarit

अकोल्याचे पाच जण गोवा बीचवर बुडाले

News Desk