HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे | राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता ५० हजारांच्या पार गेला आहे. राज्यातील मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये कोरोनाबाधितांचा सर्वाधिक आहे. त्यातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यात एका २१ वर्षीय तरुणाने कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने आपला जीव गमावला आहे. कोणतीही पूर्व व्याधी नसताना केवळ निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष केल्याने या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासांत त्याचा मृत्यू झाला.

संबंधित तरुणाला १५ मेपासून त्रास जाणवत होता. या तरुणांमध्ये कोरोनाची लक्षणे देखील दिसून येत होती. मात्र, तरीही त्याने या सर्व लक्षणांकडे आणि स्वतःला होणाऱ्या त्रासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. जवळपास ६ ते ७ दिवस या तरुणाने आपल्याला होणाऱ्या त्रासाकडे गांभीर्याने घेतले नाही. मात्र, त्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी (२२ मे) संध्या ७.३० वाजता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.‌ दुर्दैवी बाब म्हणजे रुग्णालयात दाखल करून घेतल्यानंतर अवघ्या अर्ध्याच तासात या तरुणच मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९ हजार ३१८ वर पोहोचली

News Desk

महाराष्ट्रात आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर

News Desk

जगभरातील कोरोना बाधितांची संख्या ७२ लाखांवर पोहोचली

News Desk