HW News Marathi
देश / विदेश

गणेशोत्सवाला धावणार राणेंची ‘मोदी एक्स्प्रेस’

मुंबई | दरवर्षी अनेक चाकरमाणी मुंबई, पुणे, ठाणेतून गणेशोत्सवासाठी आपाल्या गावी कोकणात येतात. यंदा चाकरमान्यांसाठी आमदर नितेश राणे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. याची माहिती त्यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. ते म्हणतात, गणेशोत्सवासाठी दरवर्षी एसटी सोडण्यात येतात. पंतप्रधान मोदी यांनी नारायण राणे यांना केंद्रात स्थान दिले आहे. त्यामुळे यंदा चाकरमान्यांसाठी एसटी ऐवजी एक विषेश रेल्वे सोडण्यात येणार आहे. याचे नाव मोदी एक्सप्रेस (modi express) असे असणार आहे. सिंधुदुर्गासह कोकणातील कणकवली, वैभववाडी, सावंतवाडी येथे ही रेल्वे चाकरमान्यांना (chakarmani) घेऊन जाणार आहे. दादर प्लॅटफॉर्म ८ वरून ही रेल्वे सुटणार असून प्रवासा दरम्यान कोकणवासीयांना एक वेळच्या जेवणाची सुविधा दिली जाणार आहे.

कोकणवासीयांसाठी ही महत्त्वाची घोषणा

या रेल्वेमध्ये अठराशे नागरिकांची आसन क्षमता आहे. यामुळे प्रवासासाठी संबंधितांनी संपर्क करण्याचा करण्याचे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे. 27 ऑगस्टपर्यंत जागा रिझर्व करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.दरम्यान एसटी गणपती आणि कोकणचे चाकरमानी यांचे एक वेगळे नाते आहे. एसटी गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांच्या सेवेत रुजू होतात. गेली दोन वर्ष कोरोनामुळे वाहतुकीवर निर्बंध होते. मात्र यंदा या बसेस धावणार आहेत, त्याचे ऍडव्हान्स बुकिंगही झाले आहे. मात्र सध्या आमदार नितेश राणे यांनी कोकणवासीयांसाठी ही महत्त्वाची घोषणा केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केजरीवालांनी महिलांच्या सुरक्षेसाठी मेट्रो आणि बसमध्ये प्रवास केला मोफत

News Desk

सत्तेत एकत्र नाही याचा अर्थ आमचं नात तुटलं असे होत नाही – उद्धव ठाकरे  

News Desk

#PulwamaAttack : जावेद अख्तर-शबाना आझमी देशद्रोही, सिद्धूची गाढवावरुन धिंड काढावी !

News Desk