HW News Marathi
महाराष्ट्र

खरा मास्टरमाईंड सुनिल पाटील, नवाब मलिकांवर षडयंत्राचा मोहित कंबोज यांचा आरोप

मुंबई। कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणातील खरा मास्टरमाईंड हा सुनिल पाटील असून त्याचा राष्ट्रवादीशी संबंध असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. तसेच सुनिल पाटील आणि नवाब मलिक ललित हॉटेलमध्ये भेटत होते. सुनिल पाटील याच्याकडेच कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती होती. ही माहिती एनसीबीला देण्यात आली तसेच त्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. नवाब मलिक यांनी एनसीबी आणि एका अधिकाऱ्याला बदनाम कऱण्यासाठी हे षडयंत्र रचले का? असा सवाल मोहित कंबोज यांनी केला आहे. तसेच नवाब मलिकांनी याबाबतचा खुलासा करावा अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे.

नवाब मलिक यांच्यात काय व्हायचे

भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले आहेत. मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे की, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा खरा मास्टरमाईंड हा सुनिल पाटील आहे. सुनिल पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य असून त्याच्याद्वारेच किरण गोसावीला एनसीबी अधिकाऱ्यांशी संपर्क करुन दिला होता. सुनिल पाटीलचा राष्ट्रवादीमधील सर्व नेत्यांशी आणि मंत्र्यांशी फार जवळचा संबंध आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि सुनिल पाटील ललित हॉटेलमध्ये भेटत होते. ललित हॉटेलमध्ये सुनिल पाटील आणि नवाब मलिक यांच्यात काय व्हायचे याबाबतचा खुलासा मलिकांनी करावा अशी मागणी कंबोज यांनी केली आहे.

सुनिल पाटीलचा आर्यन खानच्या केसमध्ये संबंध काय?

नवाब मलिकांनी सॅम डिसूझाचा उल्लेख केला आहे. प्रभाकर साईलच्या प्रतित्रापत्रात देखील सॅमचे नाव घण्यात आले आहे. तर सुनिल पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य आहे. पाटील यानेच सॅम डिसूझाला व्हॉटसअप कॉल केला होता. यामध्ये त्याने सांगितले की त्याच्याकडे २७ जणांची लिस्ट आहे. ड्रग्ज पार्टीबाबत सगळी माहिती असल्याचेही त्याने सांगितले. यानंतर सुनिल पाटीलने सीबीआयच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन देण्याची मागणी केली. त्यानुसार सॅमने एनसीबी अधिकारी व्हि व्हि सिंग यांच्याशी संवाद साधत माहिती दिली. एनसीबी अधिकारी तयार झाले आणि प्रकरणाची अधिक माहिती मागण्यात आली. यावेळी सुनिल पाटीलने सॅमला सांगितले की पुढील माहिती किरण गोसावी देईल आणि गोसावीचा नंबर सुनिल पाटील याला देण्यात आला. अशा प्रकारे कारवाई कऱण्यात आली असल्याचे मोहित कंबोज यांनी सांगितले.


मोहित कंबोज यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना ड्रग्ज माफियांची आणि ड्रग्ज तस्करी तसेच या ड्रग्ज पार्टीची माहिती कशी मिळाली? राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्री केंद्रीय तपास यंत्रणेची आणि एका व्यक्तीची बदनामी करण्यासाठी मोहिम सुरु केली आहे का? याचे स्पष्टीकरण नवाब मलिक यांनी द्यावे, तसेच नवाब मलिक आणि सुनिल पाटील यांचा काय संबंध? सुनिल पाटीलला नवाब मलिक ललित हॉटेलमध्ये कशाला भेटायचे असा सवाल मोहित कंबोज यांनी विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन्वय नाईक प्रकरण आहे तरी काय?

News Desk

पीएमपीची मोबाईल-ॲप आधारित कुरियर सेवा

News Desk

“देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत पण…!”

News Desk