HW News Marathi
महाराष्ट्र

अब मै चल पडा मेरे राह की ओर….धन्यवाद नागपूर ! मुंढेंनी घेतला नागपूरकरांचा निरोप

मुंबई । अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. मात्र, तुकाराम मुंढे तिथे रुजू होण्यापूर्वीच अवघ्या १५ दिवसांत राज्य सरकारने आपला हा आदेश मागे घेतला आहे. त्यामुळे, आता तुकाराम मुंढेंची नवी नियुक्ती नेमकी कुठे केली जाणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच, आता फेसबुकवर तुकाराम मुंढे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत या बदलीच्या आदेशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“अब मै चल पडा मेरे राह की ओर….धन्यवाद नागपूर”, असे म्हणत तुकाराम मुंढेनी नागपूरकरांचा निरोप घेतला आहे.

तुकाराम मुंढेंची फेसबुक पोस्ट

“नागपुरात सात महिने राहिल्यानंतर मी तुमचा निरोप घेत आहे. या सात महिन्यात मी या शहराला उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. त्यात काही प्रकल्प पूर्ण झाले. काही सुरु आहेत. तर काही अद्याप सुरु झालेले नाहीत. मात्र त्यातच माझी ट्रान्सफर झाली. अब मै चल पडा मेरे राह की ओर…. या नियमानुसार मी पुढील कामकाजासाठी सर्वांचा निरोप घेत आहे.

नुकतंच कोव्हिड विषाणूच्या संक्रमाणातून मुक्त झालो. अनेकांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि आलेल्या प्रत्येकाला भेटण्याचा मी प्रयत्न केला. माझ्याप्रती असलेल्या प्रत्येकाच्या भावनांचा मी आदर करतो. आपण दिलेल्या प्रेमाच्या ऋणात मी आयुष्यभर राहीन अशी ग्वाही यानिमित्ताने देतो.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कर्तव्य बजावलेला सात महिन्यांचा काळ माझ्यासाठी खूप काही शिकवणारा ठरला. कोव्हिड महामारीच्या निमित्ताने मनपा आयुक्त म्हणून जे अधिकार प्राप्त झाले, त्या अधिकाराचा उपयोग उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी कठोर निर्णय घेतले. त्यावर टीका झाली. मात्र, प्रत्येक निर्णय हा जनतेच्या भल्यासाठी घेतला, याचे समाधान नक्कीच आहे. या काळातील अनुभव आयुष्यभरासाठी शिदोरी म्हणून कामात येईल, यात शंका नाही.

जे-जे चांगले शिकायला मिळाले, ते शिकलो. काही कटू अनुभव असतीलही; मात्र त्यातूनही बोध घेतला. नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी उद्या मुंबईला रवाना होतोय. जिथे कुठे असेन, आपले प्रेम कायम सोबत असेल. या शहरासाठी काही चांगले करण्याचा प्रयत्न केला, याचा अभिमान असेल. नागपूर महानगरपालिकेतील कटू-गोड आठवणींसह मनपाला Good bye. आपण सर्वांनी जी साथ दिली त्याबद्दल Thank you…! अलविदा…!” अशी पोस्ट तुकाराम मुंढे यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छायाचित्रकार हा पोलिसांचा तिसरा डोळा – पो. नि. पडवळ 

News Desk

गांधींबद्दल वादग्रस्त ट्वीट प्रकरणी चौधरींची मंत्रालयातील पाणी पुरवठा विभागात बदली

News Desk

महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नाही, मोठ्या पक्षासोबत युती करणे योग्य – रामदास आठवले  

News Desk