मुंबई | मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्य नागरिकांनी अभिनेत्री कंगना राणावतला प्रत्युत्तर दिले आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही कंगनाविषयी संताप व्यक्त केला आहे. “उचलली जीभ आणि लावली टाळ्याला” असे म्हणत त्यांनी कंगनाला सुनावले आहे.“प्रिय कंगना, मुंबई हे असे शहर आहे, जिथे बॉलिवूड स्टार होण्याचे तुझे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यामुळे या अद्भुत शहराबद्दल आदरभाव ठेवण्याची तुझ्याकडून अपेक्षा आहे. पाकव्याप्त काश्मीरसोबत तू मुंबईची केलेली तुलना धक्कादायक आहे! उचलली जीभ आणि लावली टाळ्याला” असा रेणुका यांनी संताप व्यक्त केला आहे.
Dear @KanganaTeam Mumbai is the city where your dream of becoming a Bollywood star has been fulfilled, one would expect you to have some respect for this wonderful city. It's appalling how you compared Mumbai with POK! उचलली जीभ आणि लावली टाळ्याला 😡 https://t.co/FXjkGxqfBK
— Renuka Shahane (@renukash) September 3, 2020
दरम्यान, या नंतर रेणुका शहाणे आणि कंगणामध्ये ट्विट युद्ध झाले. “प्रिय रेणुकाजी, सरकारच्या कमकुवत कारभारावर केलेली टीका त्या शहरावरील टीका कधीपासून मानली जाऊ लागली? मला वाटत नाही की आपण इतक्या भोळ्याभाबड्या आहात. आपणसुद्धा रक्तासाठी तहानलेल्या गिधाडाप्रमाणे माझ्या मांसाचा तुकडा घेण्याची वाट पाहत होतात? आपल्याकडून चांगल्या अपेक्षा होत्या” असे कंगनाने लिहिले आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1301577058384969729?s=19
यावर पुन्हा तिला उत्तर देत, “प्रिय कंगना, मी सरकारवर टीका करण्यास हरकत घेत नाही. पण “मुंबई पीओकेसारखी का वाटत आहे” ही मला मुंबई आणि पाकव्याप्त काश्मीर यांच्यात थेट तुलना असल्यासारखं वाटतं. ही तुलना खरोखर खूप वाईट होती. मुंबईकर म्हणून मला ते आवडलं नाही! कदाचित तुझ्याकडून आणखी चांगल्याची अपेक्षा करणे, हाच माझा भोळेपणा होता” असा टोला रेणुका शहाणे यांनी लगावला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.