HW News Marathi
महाराष्ट्र

“युतीत असताना बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील?”

मुंबई | राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. चढला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार अतुळ भातखळकर यांना चांगलंच धारेवर धरलंय. “युतीत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच,” असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.

कोरोनाच्या मुद्द्यावरुन रोहित पवार यांनी केंद्रातील संसदभवानाच्या बांधकामावर टीका केली होती. त्याची दखल घेत अतुल भातखळकर यांनी काही ट्विट करत रोहित पवार यांच्यावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून पवार यांनी वरिल वक्तव्य ट्विटद्वारे केलं आहे.

काय म्हणाले रोहित पवार ?

“युतीत असताना बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते. आता ते फक्त उद्धवजींचे वडील?. भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असं ऐकलं होतं. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच,” असे रोहित पवार ट्विटद्वारे म्हणाले आहेत.

केंद्रासारखी जबाबदारी झटकली नाही

पुढे बोलताना त्यांनी राज्यात होणाऱ्या मोफत लसीकरणावरुन भातखळकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. “राज्याची स्थिती नाजूक असतानाही राज्याने लसीकरणाचा भार उचलण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारप्रमाणे लसीकरणाची जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलली नाही,” असं रोहित पवार म्हणाले आहेत.

 

राजकीय पतंगबाजी टाळली तर बरं होईल – रोहित पवार

तसेच पुढे बोलताना सध्या राजकीय वक्तव्य करण्याची वेळ नाहीये. लोकांचे प्राण पणाला लागलेले आहेत, हे विसरु नये. त्यामुळे सध्या राजकीय पतंगबाजी टाळली तर बरं होईल, असा सल्लासुद्धा त्यांनी अतुल भातखळकर यांना दिला.

अतुल भातखळकर काय म्हणाले ?

देशात कोरोनाचा कहर आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो आहे. पण देशात नव्या संसद भवनाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे प्राधान्य कशाला द्यावे याचा विचार करण्याची गरज आहे, असे रोहित पवार म्हणाले होते. त्याला उत्तर म्हणून “मुख्यमंत्री ४०० कोटी रुपये खर्चून वडिलांचे स्मारक उभरत आहेत. त्यांना रोहित पवार यांनी लसीकरण महत्त्वाचे की काय हा प्रश्न विचारावा. आपल्या गृहमंत्र्याने फ़क्त मुंबईतून केलेली वसूली दीड हजार कोटी आहे असे म्हणतात. ती रक्कम लसीकरणासाठी वळवा म्हणतो मी,” अशी टिप्पणी भातखळकर यांनी केली. दरम्यान, रोहित पवार आणि अतुल भातखळकर यांच्या या ट्विट वॉरमुळे राजकीय पटलावर अनेक चर्चा रंगल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगणाचा विषय माझ्यासाठी संपला-संजय राऊत

News Desk

कर्नाटकातील आलमट्टी धरणातून ५ लाख क्यूसेक्स पाणी सोडले

News Desk

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडूनही श्रद्धांजली

News Desk