मुंबई | नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काल (८ जुलै) पार पडला. या मंत्रिमंडळाच्या यादी मध्ये १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळाचं चर्चेचं कारण ठरलं ते म्हणजे ४ मंत्री हे महाराष्ट्राचे आहेत. नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. या चार खासदारांपैकी तीन खासदार हे बाहेरील पक्षांमधून आलेले आहेत. दरम्यान नारायण राणेंना मोदींच्या मंत्री मंडळात स्थान देण्यावरुन राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती. , मात्र या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून महाविकासघडीकडून टीकात्मक वक्तव्य येत आहेत.
बिघडलंय तर इंजिन आणि बदलले डबे..!
मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून राजिक्य वातावरणामध्ये अनेक खळबळ माजली आहे. महाविकासघडीकडून ट्विट द्वारे टीका केली जात आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत, ‘बिघडलंय तर इंजिन पण बदलले डबे, व्वा मोदीजी व्वा!’ असं ट्विट केलं आहे.
बिघडलंय तर इंजिन आणि बदलले डबे..!
व्वा मोदीजी व्वा !!— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) July 7, 2021
राष्ट्रवादीनेही ट्विट करत केली टीका
‘राजीनामा दिलेल्या मंत्र्यांची नावे आणि नव्याने मंत्रीपदी विराजमान होणाऱ्यांची नाव वाचून असं वाटतंय इथून पुढे आयारामांना पक्ष सदस्य होण्यापूर्वी मंत्रीपदाची शपथ दिली जाईल’. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही मोदींच्या मंत्रीमंडळात निष्ठावान कार्यकर्त्यांना
डावलून आयारामांना संधी दिल्याबद्दल निशाणा साधला आहे.
राजीनामा दिलेल्या मंत्र्यांची नावे आणि नव्याने मंत्रीपदी विराजमान होणाऱ्यांची नाव वाचून असं वाटतंय इथून पुढे आयारामांना पक्ष सदस्य होण्यापूर्वी मंत्रीपदाची शपथ दिली जाईल.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 7, 2021
४३ नव्या नेत्यांची नावं
१. नारायण तातू राणे
२. सरबनानंद सोनोवाल
३. डॉ. वीरेंद्र कुमार
४. ज्योतिरादित्य सिंधिया
५. रामचंद्र प्रसाद सिंग
६. अश्विनी वैष्णव
७. पशुपती कुमार पारस
८. किरेन रिजिजू
९. राज कुमार सिंग
१०. हरदीपसिंग पुरी
११. मनसुख मांडवीया
१२. भूपेंद्र यादव
१३. पुरुषोत्तम रुपाला
१४. जी किशन रेड्डी
१५. अनुराग सिंग ठाकूर
१६. पंकज चौधरी
१७. अनुप्रिया सिंग पटेल
१८. सत्यपाल सिंग बघेल
१९. राजीव चंद्रशेखर
२०. सुश्री शोभा करंडलाजे
२१. भानू प्रताप सिंग वर्मा
२२. दर्शना विक्रम जर्दोश
२३. मीनाक्षी लाड
२४. अन्नपूर्णा देवी
२५. ए. नारायणस्वामी
२६. कौशल किशोर
२७. अजय भट्ट
२८. बी. एल. वर्मा
२९. अजय कुमार
३०. चौहान देवीसिंह
३१. भगवंत खुबा
३२. कपिल मोरेश्वर पाटील
३३. प्रतिमा भौमिक
३४. सुभाष सरकार
३५. भागवत किशनराव कराड
३६. राजकुमार रंजन सिंग
३७. भरती प्रवीण पवार
३८. बिश्वेश्वर तुडदु
३९. शंतनू ठाकूर
४०. मुंजापरा महेंद्रभाई
४१. जॉन बारला
४२. एल. मुरुगन
४३. नितीश प्रामाणिक
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.