HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊत यांच्या हृदयात दोन ब्लॉकेज, अँजिओप्लास्टी यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई। शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये २ ब्लॉक होते. संजय राऊत हे काल (११नोव्हेंबर) दुपारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. यानंतर त्यामुळे राऊतांवर राऊत यांच्यावर डॉक्टर अजित मेनन यांच्या देखरेखीखाली अँजिओप्लास्टी करण्यात आली. अँजिओग्राफी करण्यात आल्यानंतर आता त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली.

राऊत गेल्या २० दिवसांपासून ते शिवसेनेची भूमिका सातत्याने माध्यमांसमोर मांडत आहेत. अत्यंत आक्रमकपणे राऊतांनी शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा ही भूमिका त्यांनी सातत्याने माध्यमांसमोर मांडली. यासाठी शरद पवार यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. काल देखील वांद्रे येथील हॉटेल ताज लँड येथील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीत उपस्थित होते. मात्र, अचानक छातीत दुखू लागल्याने ते रुग्णालयात गेले. या बैठकीनंतर शरद पवार वाय बी चव्हाण सेंटर तर उद्धव ठाकरे मातोश्रीवर रवाना झाले.

मात्र संजय राऊत हे थेट लीलावती रुग्णालयात गेले. संजय राऊत यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली झाली. राऊतांना ४ दिवसांनंतर डिस्चार्ज मिळणार असून पुढील तीन दिवस ते अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. सध्या त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू सुनील राऊत, कुटुंबातील सदस्य प्रवीण राऊत, सुजित पाटकर तसेच शिवसेना पदाधिकारी भाऊसाहेब चौधरी, संजय सावंत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणेशोत्सवात जुगार खेळू देण्याची आमदार, खासदारांची मागणी

News Desk

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे आज  राज्यव्यापी आंदोलन – बाळासाहेब थोरात

News Desk

श्रीगुरू बालाजी तांबे यांची अखेर 81व्या वर्षी प्राणज्योत मालवली!

News Desk