HW News Marathi
महाराष्ट्र

नाशिकजवळच्या भीषण अपघातात दोघे ठार

नाशिक : तवेरा कार गॅस टँकरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार, तर जण गंभीर जखमी झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकच्या आडगाव शिवारात बळी मंदिराजवळ सोमवारी सकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

पुष्पा देवकिसन गगराणी व तवेरा चालकाचा यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे, तर देवकिसन गगराणी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गगराणी यांचा मुलगा व सून अमेरिकेत स्थायिक असून ते त्यांना मुंबई येथे विमानतळावर सोडण्यासाठी गेले होते. तेथून मालेगावकडे परतत असताना हा अपघात घडला. टॅँकरला मालेगावकडे जाणाऱ्या भरधाव तवेराने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती त्यात कारचा पूर्ण चक्काचूर झाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीएलएसएस योजनेच्या विस्ताराची घोषणा

News Desk

शिवस्मारकाच्या बांधकामाला २४ ऑक्टोबरचा मुहूर्त

swarit

विहंग सरनाईक चौकशीसाठी ईडीच्या ताब्यात

News Desk