HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे मेट्रोची २ स्थानके दिसणार पुणेरी पगडीच्या आकारात

पुणे | दिल्लीत सोमवारी (२८ जानेवारी) पुणे मेट्रोसाठी २००० कोटी रुपयांच्या अर्थसहाय्याकरिता महत्त्वपूर्ण सामंजस्य करार पार पडला. यावेळी महामेट्रोचे कार्यकारी व्यवस्थापक ब्रजेश दीक्षित यांनी पुणे मेट्रोचे वैशिष्ट्य सांगितले आहे. पुणे मेट्रोची दोन स्थानके विशेष अशा पुणेरी शैलीत दिसणार आहेत. ही स्थानके पुणेरी पगडीच्या आकारात बनवली जाणार असल्याची माहिती ब्रजेश दीक्षित यांनी दिली आहे.

पुणे मेट्रोची संभाजी पार्क आणि डेक्कन ही दोन मेट्रो स्थानके खास पुणेरी पगडीच्या आकारात तयार केली जाणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. तसेच पुणे मेट्रोची ही संकल्पना पुणेकरांना भावली असून, याला चांगला प्रतिसाद देखील मिळत असल्याचे दीक्षित म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

४ माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनल सुरु करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य

News Desk

आजपासून राज्यपाल नागपूर मुक्कामी, मुंबई परतीचा उल्लेख नाही 

News Desk

सीरमला लागलेल्या आगीवरुन राजकीय वर्तृळात वेगळीच चर्चा रंगली!

News Desk