HW News Marathi
महाराष्ट्र

हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी ही केवळ अफवा, धनंजय मुंडेंचे ट्विट

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची माहिती आज (२८ जानेवारी) समोर आली होती. परंतु हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी ही केवळ अफवा असल्याचे धनंजय मुंडे यांनी ट्विट करून सांगितले आहे. कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या सभेसाठी जात असताना मुंडे आणि भुजबळ अचानक जोराच्या वाऱ्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची माहिती मिळाली होती.

“मी बीड येथील गहिनीनाथगडाचा कार्यक्रम संपवून कोल्हापूरच्या सभेसाठी जात आहे. हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी चूक असून काहीही झालेले नाही, आम्ही १० मिनिटांत कोल्हापूरच्या विमानतळावर उतरू. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. माझ्यावर भगवंताची कृपा आणि जनतेच्या सदिच्छा आहेत’ असे ट्वीट धनंजय मुंडे यांनी केले आहे.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कौशल्य विकासाला आता मिळणार सीएसआरची जोड; राज्य शासनही देणार आर्थिक योगदान; राजेश टोपेंची माहिती

Aprna

मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावरुन संजय निरुपम यांची हकालपट्टी ?

News Desk

१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींचे महाविकास आघाडी समर्थन करते का?

Aprna