HW News Marathi
महाराष्ट्र

“एकदा का उद्रेक झाला तर कोणी रोखणार नाही”, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन उदयनराजे झाले आक्रमक 

सातारा | मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले आज (२८ जानेवारी) एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी ‘मराठा समाजाला दुसऱ्याचं आरक्षण काढून आम्हाला द्या अशी आमची मागणी नाही’, असं उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले. साताऱ्यात अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचं उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी दोन्ही राजे एकाच व्यासपीठावर पाहण्यास मिळाले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर दोन्ही राजेंनी आपली रोखठोक भूमिका मांडलेली पाहायला मिळाली.

‘या कार्यक्रमाला आमचे खास बंधू’ असं म्हणत उदयनराजे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. मराठा मोर्चे आतापर्यंत अत्यंत शांतपणे निघाले आहे. प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाला वेगळी वागणूक देणे हे योग्य नाही. आम्हाला दुसऱ्याच आरक्षण काडून आम्हाला द्या अशी आमची मागणी नाही. जसं त्या समाजाला आरक्षण देण्यात आले, तसे आम्हालाही देण्यात यावे. आमच्यावरच अन्याय का? असा सवाल उदयनराजेंनी उपस्थितीत केला आहे.

निवडणुका आणि सत्ता या दर पाचवर्षांनी येत असतात आणि जात असतात. पण ही लोकं तुम्हाला साथ देण्यासाठी असता. त्यामुळे या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठीशी राहिले पाहिजे. आज आरक्षणावरून वादळ सुरू असताना सुप्रीम कोर्टात वकील वेळेवर हजर राहत नाहीत. हे जाणूनबुजून केले जात आहे, असा आरोपही उदयनराजे यांनी केला.

‘लोकांच्या भावना समजून घ्या, लोकांचा अंत पाहून नका, एकदा का उद्रेक झाला तर कोणी रोखणार नाही. मी तरी काय सांगणार आहे.आपल्या कुटुंबासाठी ही लोकं रस्त्यावर उतरली आहे’, असा इशाराही उदयनराजेंनी दिली. ‘आता कुठे तरी राजकारण थांबले पाहिजे. लोकांसाठी आणि समाजासाठी एकत्र आले पाहिजे. थोडी तरी जणाची नाहीतरी मनाची लाज बाळगूण काम केले पाहिजे, राजकारणाच्या नादात गजकरण झाले आहे, असंही उदयनराजे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेली ‘ही’ योजना ठाकरे सरकारकडून रद्द  

News Desk

मुंबईतील ९५० हून अधिक कोरोना मृत्यू का दडवले ?, फडणवीसांचा सवाल

News Desk

प्रगती का हायवे! महाराष्ट्रातील रस्ते बांधणासाठी २,७८० कोटी मंजूर

News Desk