HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना नाव काढून टाका आणि ठाकरे सेना करा !

पुणे | ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरून देशभरात संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी आज (१४ जानेवारी) आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकासआघाडीवर हल्लाबोल केला आहे. या पुस्तकावर महाराजांच्या वंशांनी आपली भूमिका घ्या, असे राऊत म्हणाले होते. यावरून उदयनराजे म्हणाले की, महाराजांच्या नावाने शिवसेनेची स्थापना करताना वंशजांना विचारले होते का?, असा सवाल त्यांना विचारला. पण आता शिवसेना नाव काढून टाका आणि ठाकरे सेना करा, असा सल्लाही उदयनराजेंनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

उदयनराजे भोसले पुढे म्हणाले की, “शिवसेना पक्षाला नाव देताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारायला आला होतात का? असा सवाल करत उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर थेट हल्लाबोल चढवला. ‘घड्याळ’वाल्यांची वेळ आता संपत आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव ‘जाणता राजा’ होते, अशा शब्दात त्यांनी शरद पवारांवरही अप्रत्यक्ष तोफ डागली. इतक्यावरच न थांबता त्यांनी आता शिवसेनेचे नाव बदलूशिवाजी महाराजांचे नाव वडापावला देता ? आम्ही शिवसेना नावावर आम्ही कधी हरकत घेतली नाही. खरंतर शिवसेनेचे नाव बदलून ठाकरे सेना केली पाहिजे, असा टोलाही उदयनराजेंनी लगावला.

या परिषदेत उदयनराजेंनी महाविकास आघाडीच्या सरकारवर असंख्य टोले लगावत प्रश्नांचा भडिमारही केला. दादर येथील शिवसेनाभवनावर शिवरायांचा फोटो खाली आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वर का? तसेच महाराजांच्या नावाने शिवसेनेची स्थापना करताना वंशजांना विचारले होते का? अशीही विचारणा त्यांनी केली. “लोकांनी बुद्धी गहाण ठेवली का ते कळत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाची तुलना होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांच्या जवळही जाण्याची कोणाची लायकी नाही”, अशा शब्दांतही त्यांनी खडे बोल सुनावले.

शिवाजी महाराजांचं आत्मचरित्र वाचलं, त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न केला म्हणून आपण शिवाजी महाराज होत नाही. आम्ही महाराजांचे वंशज आहोत पण कधीही त्यांच्या आडनावाचा दुरुपयोग केला नाही. राजेशाही संपल्यावर आम्ही लोकशाही मान्य केली. सर्वधर्मसमभाव ही कल्पना कुठं गेली? जो बिनपट्ट्याचा रस्त्यावर फिरतोय त्याने त्याची लायकी दाखवून द्यावी, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला गेला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अख्खा मेंदू राज्यात आहे, प्रकाश आंबेडकरांची खोचक टीका

News Desk

जळगावात खडसे-फडणवीसांची भेट, चर्चादरम्यान महाजन उपस्थित

News Desk

दापोली-खेड मार्गावर मॅक्झिमो गाडीची डंपरला धडक, ५ जणांचा मृत्यू

News Desk