HW News Marathi
महाराष्ट्र

“मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय केलं ते सांगा”, उदयनराजेंचा थेट अजित पवारांना सवाल

सातारा | राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. १५ मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या या गोंधळावरुन भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारला टोला लगावला आहे. साताऱ्यात आज (११ मार्च) प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आता माझ्या हातात काही राहीलं नाही अशी खंतही व्यक्त केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की, अजित दादांबद्दल काय सांगायचं? ही राज्याची समस्या आहे तुम्ही ती केंद्राकडे ढकलत आहात. तुम्ही काय करता ते सांगा. तुम्ही काय केलं याचं उत्तर द्यायला कोणी तयार नाही. आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही स्वत:ला तज्ञ समजत असाल तर लोकांना श्वेतपत्रिका द्या, असा थेट आघात त्यांनी केला आहे.

पुढे ते असंही म्हणाले की, माझ्या हातात आता काही राहिलं नाही. माणसांमध्ये भांडण लागावी असं त्यांना वाटत असेल तर लागणारच. लोकं सरकारला सोडणार नाही. या सगळ्याचा उद्रेक होईल. तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे तर जा लोकांसमोर आणि सांगा आरक्षण का दिलं नाही. नाहीतर या सगळ्यांना मुकबधिरांच्या शाळेत टाका नाहीतर सगळ्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा, असं म्हणत त्यांनी आपला राग सरकारवर काढला आहे.

तसेच पुढे बोलताना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या मानसिक परिस्थितीविषयी भाष्य केले. “छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही राजकारण केल नाही. म्हणून स्वराज्याची स्थापना झाली. मराठा कुटुंबात मी जन्मलो म्हणून नाही तर वाटत प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजेत अशी माझी भूमिका आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्या रास्त आहेत. मराठा सामाजातील अनेक मुलांनी आत्महत्या केल्या. अशामुळे मराठा मुले फस्ट्रेशनमध्ये येणार नाहीत का?,” असे उदयनराजे म्हणाले. तसेच, राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर श्वेदपत्रिका काढावी. सरकारने काय दिवे लावले ते लोकांना कळू दिले पाहिजे,” असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड

News Desk

दप्तराविना शाळा! अनोख्या उपक्रमातून परिवर्तनाचे धडे

News Desk

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक

News Desk