HW News Marathi
महाराष्ट्र

उदयनराजे यांनी घेतली गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट 

सातारा | एकीकडे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची राष्ट्रवादीशी जवळीक वाढत असताना, साताऱ्यात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे दिलजमाईचे संकेत आहेत. त्यानंतर आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. उदयनराजे भोसले हे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय खलबते रंगली.

दरम्यान, उदनयराजे आणि शंभूराज देसाई यांची ही काही पहिलीच भेट नाही. यापूर्वी अनेकवेळा दोन्ही नेते एकमेकांना भेटले आहेत. उदयनराजे आणि शंभूराज देसाई हे वर्गमित्र आहेत. यापूर्वीच्या भेटीत शंभूराज देसाईंनी ही माहिती दिली होती.

भेटीनंतर उदयनराजे काय म्हणाले?

शंभुराज देसाई यांचे घराण्याचे घनिष्ठ संबंध आहेत. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत दोन दिवसात महत्वाच्या नेत्यांची संयुक्त बैठक होणार असल्याचे ते म्हणालेत. 8 मार्चपासून मराठा आरक्षण सुनावणी आहे. मराठा आरक्षणाबाबत कोणीही राजकारण करु नये. त्यादरम्यान अधिवेशन होत असल्यामुळे या विषयी चर्चा झाली. सातारा शहरात लष्कर प्रशिक्षण केंद्र आणण्याबाबत शंभुराज देसाईंसोबत चर्चा झाली.

मराठा आरक्षणाबाबत लीड कायम मी घेतलंय पण आता ते गळाला आलंय. वकील सर्वच हुशार आहेत, परंतु जी आत्मियता लागते अशा वकिलांची नेमणूक करा. मी कोणाच्या विरोधात नाही पण यामध्ये विसंगती दिसून येते. जिल्हा बँकेची निवडणुक लागलीये याप्रश्नावर फलटणचे राजे,आमचे सातारचे राजे,लोकशाहीचे राजे कसली आखणी करताहेत हे काळ आणि वेळ सांगेल, असं उदयनराजे म्हणाले.

उदयनराजे भोसले हे गेल्या काही दिवसांपासून दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात उदयनराजेंनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे नेमकी राजकीय वर्तुळात काय चालले आहे हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठरलं ! राणाजगजितसिंह पाटील भाजपमध्ये जाणार

News Desk

गारपिटीमुळे पोपटांनी प्राण गमावले

News Desk

“प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला, पण…”, रोहित पवारांचा फोटो ट्विट करत पडळकरांचा इशारा

News Desk