HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिल्याने आदित्यनाथ यांचे उदयनराजेंनी मानले आभार

मुंबई | भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी आग्रा येथे बांधण्यात येणाऱ्या संग्रहालयाला मुघलांचे नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देणार असल्याची घोषणा केली आहे. यानिमित्ताने उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मनापासून अभिनंदन असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला तो आग्य्रातल्या औरंगजेबाच्या दरबारातून. महाराजांनी याच दरबारातल्या अपमानाचा बदला घेवून अखंड हिंदुस्तानावर राज्य केलं. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आग्रा नगरीत ‘छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय’ स्थापनेचा ऐतिहासिक निर्णय हा संपूर्ण देशाला अभिमानास्पद आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच मनापासून अभिनंदन”, असे ट्विट उदयनराजेंनी केले होते.

योगी आदित्यनाथ यांनी काल (१४ सप्टेंबर) ट्विट करत सांगितले होते की, “गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतीक चिन्हांना नव्या उत्तर प्रदेशात काहीही स्थान नाही. आपल्या सगळ्यांचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळेच आता आग्रा येथे बांधण्यात येणारं हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखलं जाईल”.

Related posts

#Amritsar : लोकांचा उद्रेक, पोलिसांवर केली दगडफेक

Gauri Tilekar

इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता अंमलबजावणी करा !

News Desk

कोस्टल रोडमुळे मुंबई अधिक सुविधायुक्त

News Desk