HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मराठा आरक्षणाचे नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावे, विनायक मेटेंची विनंती 

बीड | मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाच्या संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला. अशात भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे, अशी विनंती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे.“मराठा समाजातील सर्वच घटकांना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोबत घ्यावे. समाजाच्या भल्यासाठी आरक्षणा संदर्भात पुढील दिशा ठरवून नेतृत्व करावे. राज्यातील सर्वच समाज घटक त्यांच्या नेतृत्वात काम करतील. त्यामुळे उदयन महाराजांनी धुरा सांभाळावी” असे मत विनायक मेटे यांनी व्यक्त केले आहे.

“मराठा आरक्षणाच्या अमलबजावणीला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजासाठी काम करणाऱ्या संघटना, नेते, पदाधिकारी, मान्यवर मंडळीनी आपापली मतं, रोष व्यक्त केला आहे. मात्र एकमेकांना पूरक नसलेली किंवा एकवाक्यता नसलेले विचार दिसतात. मराठा समाजाचे आरक्षण अबाधित राहावे यासाठी काय काय भूमिका घ्यावी, मग आंदोलनाबाबत असो, न्यायालयात असो किंवा सरकारविरोधात, भूमिका घेण्यासाठी कोणी तरी पुढाकार घेणे आवश्यक आहे” असे विनायक मेटे म्हणाले.

“या जगात छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. त्यांचे १३ वे वंशज छत्रपती उदयनजी महाराज यांनी पुढाकार घ्यावा. मराठा समाजासाठी काम करणाऱ्या संघटनांना उदयनराजे भोसले यांनी एकत्र करावे. मराठा समाजाचे सारथी, बलिदानांना न्याय मिळण्यासाठी नियोजन करावं, पुढची भूमिका ठरवावी आणि ते लवकरात लवकर करावे. राज्य सरकारने आरक्षणावर लवकर निर्णय घ्यावा, समाजाला न्याय द्यावा; अन्यथा समाजाला रस्त्यावर पुन्हा उतरण्याशिवाय पर्याय नसेल” असा इशाराही मेटेंनी दिला.

Related posts

राज्यात ७२२ रुग्ण कोरोनामुक्त, तर मुंबईतील ३७४ जणांना डिस्चार्ज | राजेश टोपे

News Desk

विरोधकांना देशासोबत उभे राहण्यात संकोच वाटतो !

News Desk

लग्न झाले का?’ हा प्रश्न महादेव जानकरांना विचारायला हवा

News Desk