HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊतांना प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव न्यायालयाने बजावले समन्स

मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना बेळगाव न्यायालयाने (Belgaum Court) समन्स बजावला आहे. काही दिवसांपूर्वीच राऊत हे तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेले आहे. आता बेळगाव न्यायालयाने 2018मध्ये राऊतांना प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी समन्स पाठविला आहे.

राऊतांनी 30 मार्च 2018 मध्ये बेळगावात प्रक्षोभग भाषण केले होते. या प्रकरणी बेळगाव न्यायालयाने समन्स पाठविला असून राऊतांना 1 डिसेंबरपर्यंत बेळगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली आहे. “महाराष्ट्रातील सांगली  जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटकात समावेश करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे”, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकतेच केले आहे. यानंतर राज्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर राजकारण तापलेले आहे.

बेळगाव न्यायालयाने समन्स पाठविल्यानंतर राऊतांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, “कर्नाटक सरकारने कायद्याचा बडगा दाखवून त्यांना तुरुंगात टाकले. तर याचे महाराष्ट्रात पडसात उमटतील. यात प्रक्षोभक काय आहे?, हे मला कळाले नाही. परंतु, 2018 मध्ये केलेल्या भाषणाची दखल घेऊन त्यांनी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. याचा अर्थ असा आहे की, मी न्यायालयात गेल्यावर माझ्यावर हल्ला व्हावा”, अशी माहितीही राऊतांनी माध्यमांशी बोलताना दिली.

 

 

Related posts

“निवडणुकीतील आमिषाला राजेश कदम बळी पडले असावेत” –  राजू पाटील

News Desk

अण्णा हजारेंचा मोदी सरकाराला अखेरचा इशारा

News Desk

‘ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच’ विरोधी पक्षाची टीका

Ruchita Chowdhary