HW News Marathi
महाराष्ट्र

बांधकाम कामगारांना ठाकरे सरकारने दिले आर्थिक पाठबळ

मुंबई | कोरोनाच्या या भयावह काळात लॉक़डाऊनचे सगळ्यात जास्त चटके हे शेतकरी आणि मजूर वर्गाला बसले आहेत. त्यांचे झालेले अतोनात हाल यावर एक तोडगा म्हणून १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपये देण्याचे ठाकरे सरकारने जाहीर केले आहे. ही रक्कम थेट त्यांच्या बॅंकेच्या खात्यात जमा होणार आहे.

सद्यस्थितीला सगळी बांधकामे ही ठप्प आहेत. त्यामूळे मजूरांवर आर्थिक संकट खूप मोठे आहे. त्यामूळे त्यांची आर्थिक चणचण थोड्याफार प्रमाणात का होईना पण कमी होण्यासाठी हा पर्याय शोधला आहे. दरम्यान, संकट काळ समोर आलेला असताना बांधकाम मजुरांच्या खात्यात पैसे जमा केले जावे असा प्रस्ताव राज्याच्या कामगार विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडला होता. त्यानुसार मदतीच्या स्वरुपात प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण । तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

News Desk

राज्यपालांच्या राजीनाम्यावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna

देशातील पहिल्या कोरोना समर्पित केंद्राची रिलायन्सकडून उभारणी

swarit