HW News Marathi
महाराष्ट्र व्हिडीओ

राज्यपालांच्या राजीनाम्यावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई | “राज्यपाल यांचा राजीनामा स्वीकारण्याचा हा निर्णय फार आधीतच घ्यायला हवा होता”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर दिली आहे. राज्यपाल द्रौदी मुर्मू यांनी आज (१२ फेब्रुवारी) भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

शऱद पवार म्हणाले, “माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली. राज्यपालांना बदलण्याचा निर्णय अतिशय चांगला असून हा निर्णय फार आधीच घ्यायला हवा होता.   महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती राज्यपाल कधीच झाली नव्हती. राष्ट्रपतींनी राज्यपाल बदलण्याचा घेतलेला निर्णय हा अतिशय समाधानकारक आहे. संविधानाच्या विरोधात जे जे झाले असेल, त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे.”

 

मविआ आणि राज्यपालमधील वाद

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल यांच्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादीमुळे महाविकास आघाडी आणि त्यांच्यात मतभेद झाला होता. तसेच राज्यपालांनी वारंवार महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे विरोधकांसह राज्यातील जनतेचा रोष त्यांनी ओडून घेतला होता. अलीकडच्या काळात राज्यपाल भवनाकडे शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेचे पत्रच नाही, अशी माहिती माहिती अधिकारातून समोर आली होती. यानंतर विरोधकांनी राज्यपालांना धारेवर धऱले होते. राज्यपालांच्या वारंवार वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात विरोधक आणि त्यांच्या वाद विकोपाला गेला होता.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सर्व यंत्रणा विरुद्ध शिवसेना”, Manisha Kayande यांचा विरोधकांना टोला

Chetan Kirdat

कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंचे निर्देश

Aprna

Raj Thackeray MNS | ठरलं ! मनसेच्या प्रचाराला ५ ऑक्टोबरपासून होणार सुरुवात

Gauri Tilekar