HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यानी आस्थेने १०३ वर्षांच्या स्वातंत्र्य सैनिकाची चौकशी केली

मुंबई | देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. मुंबईतील शिवाजी पार्कात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झालं. यानंतर भगत सिंह कोश्यारी यांनी राज्याला उद्देशून भाषण केले. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सायबर पोलीस ठाणे उद्घाटन सोहळा झाला.

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पाच विभागीय सायबर पोलीस ठाण्यांचे ॲानलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. याचबरोबर ९४ पोलीस ठाण्यातील स्वागत कक्षांचे उद्घाटन देखील केले.

शिवाजी पार्क येथे राष्ट्रध्वजवंदन कार्यक्रमास आवर्जून उपस्थित १०३ वर्षांचे स्वातंत्र्य सैनिक सत्यबोध सिंगीत यांना पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या जवळ गेले आणि त्यांनी विचारपूस केली. सत्यबोध यांच्यासमवेत त्यांचा मुलगा आणि सूनदेखील होते. स्वतः मुख्यमंत्री आस्थेने चौकशी करताहेत म्हटल्यावर सत्यबोध सिंगीत यांनी आनंद व्यक्त करुन त्यांनी आशीर्वाद दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोहरादेवी जगदंबा देवीचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण  

News Desk

नागपूर मेट्रोची जॉय राईड

News Desk

भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्दचा आंतरराष्ट्रीय जलपर्यटन प्रकल्प सर्वोत्तम, देशातील पथदर्शी असा ठरावा! – मुख्यमंत्री

Aprna