HW News Marathi
देश / विदेश

मुख्यंमंत्र्यांची कुटुंबासमवेत अयोध्या वारी !

मुंबई | मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यासाठी सहकुटुंब रवाना झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन १०० दिवस पुर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येत रामजन्मभूमीचे दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत दुपारी दाखल होतील. त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक आधीच अयोध्येत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद होईल, त्यानंतर साडेचार वाजता ते रामलल्लाचे दर्शन घेतील. पर्यावर मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, कॅबिनेटमधील काही मंत्री आणि शिवसेनेचे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही हजेरी लावली आहे. काँग्रेस नेते आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदारेही अयोध्येत दाखल झाले आहेत.

दरम्यान, हिंदू महासभेने उद्धव ठाकरेंच्या अयोध्यावारीला विरोध केला आहे. सरकार स्थापन झाल्यापासून उद्धव यांच्या नियतीमध्ये फरक पडला आहे. शिवाय ते मुस्लिमांना आरक्षण देत आहेत. या मुद्दयावरुन हिंदू महासभेने ठाकरेंच्या अयोध्यावारीला विरोध दर्शवला. मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी अयोध्येत दाखल होत त्यांच्या आगमाची जय्यत तयारी केली आहे. तसेच, अयोध्येत ठिकठिकाणी हॉर्जिंग्जही लावण्यात आले आहेत. दौऱ्याच्या नियोजनानुसार मुख्यमंत्री शरयु तीरावर आरती करणार होते पण देशभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसमुळे शरयु तीरावरील गर्दी टाळण्यासाठी के आरती करणार नाही आहेत. त्यामुळे फक्त प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री मुंबईच्या दिशेने रवाना होतील.

मुख्यमंत्री पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे कुटुंबासमवेत अयोध्येत रामाच्या दर्शनासाठी जात आहेत. अर्थात त्यांचे हे पहिल्यांदा अयोध्येत पाऊल नाही आहे तर या आधी २०१८ साली उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यासह अयोध्येत गेले होते. या दौऱ्याचे आयोजन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या उद्दशाने केला होता. राम मंदिर हा सेना आणि भाजपच्या युतीचा महत्त्वाचा अजेंडा होता आणि त्याच अनुशंगाने निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी अयोध्या वारी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१८० शेतकरी संघटना आंदोलनाच्या तयारीत

News Desk

‘जबरदस्तीने तुम्हांला घरात बसवू ‘ तुकाराम मुंढेंचा नागपुरकरांना इशारा !

Arati More

NewYear2019 : गुगलने दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा

News Desk