HW News Marathi
देश / विदेश

उद्धव ठाकरेंना वाटेल तेव्हा ते अयोध्येत जाऊ शकतात, कोणीही ठेका घेतलेला नाही !

मुंबई । “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यापुढे अयोध्येत येऊ नये. यानंतरही जर ते अयोध्येत आलेच तर इथे कोणीही त्यांचे स्वागत करणार नाही. उलट इथे त्यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागेल”, असा इशारा आता अयोध्येतील संतमंडळी आणि विश्व हिंदू परिषदेने दिला आहे. “उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने अयोध्येत येऊ नये”, असा इशारा देण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि महाविकासआघाडी सरकारमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चांगलीच जुंपलेली असताना आता याला मिळत असलेले धार्मिक वळण निश्चितच चिंताजनक आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाटले तर ते कधीही अयोध्येत जाऊ शकतात !

“प्रत्येक हिंदू अयोध्येत जाऊ शकतो. विश्व हिंदू परिषदने काही त्याचा ठेका घेतलेला नाही. आम्ही देखील हिंदू आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यापूर्वीही अयोध्येत जाऊन आले आहे. त्याचप्रमाणे, यापुढेही जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा कधीही ते अयोध्येत जाऊ शकतात”, असे राज्याचे कॅबीनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

कंगनाला केवळ बॉलिवूड माफियाच नव्हे तर सरकारही घाबरले !

अखिल भारतीय आखाडा परिषदचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी म्हणतात की, “कंगना राणावत ही या देशाची शूर आणि धाडसी मुलगी आहे. तिने बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांच्या रॅकेटचे उद्योग उघडकीस आणले आहेत. कंगनाने बॉलिवूडच्या एका विशेष समूहाविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे केवळ बॉलिवूड माफियाच नव्हे तर सरकारही घाबरले आहे. शिवसेना आता सोनिया सेना झाली आहे. जी व्यक्ती सरकारविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करते त्याच व्यक्तिवर आरोप करून कारवाई केली जात आहे. म्हणूनच, आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यापुढे अयोध्येत येऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जेव्हा उपसभापतीच निलंबित खासदारांसाठी चहा घेऊन येतात…

News Desk

पाकिस्तानमधील पेशावरमध्ये झाला बॉम्बस्फोट, ७० जण जखमी तर ७ जणांचा मृत्यू

News Desk

शरद पवारांसोबतच्या बैठकीत नक्की काय चर्चा झाली?, प्रशांत किशोरांचा खुलासा

News Desk