HW News Marathi
Covid-19

लॉकडाऊन तुर्तास नाही पण पूर्ण लॉकडाऊनचा मुख्यमंत्र्यांचा इशारा!

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२ एप्रिल) राज्याला संबोधित केलं. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. आधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचं बघू, आज पूर्ण लॉकडाऊन इशारा देतोय. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“येत्या काही दिवसात मी तज्ज्ञांशी, पत्रकारांशी बोलेन. मला वेगळा उपाय काय तो सांगा. लॉकडाऊन हा उपाय नाही मान्य. पण संसर्गाची साखळी तोडायची कशी? लसीकरण वाढवा म्हणता, तो वाढवतोच आहे. पण लसीने कोरोना होत नाही असं नाही. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर आपल्याला परत लॉकडाऊन करायचा की काय ही शक्यता आहे. ती अजूनही टळलेली नाही”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. एकीकडे पुण्यात मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पुण्यात ७ दिवसांसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. पुण्यात संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल, तर दिवसा जमावबंदी लावण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतात आता रशियाच्या स्फुटनिक लसीच्या वापराला परवानगी! 

News Desk

महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील !

News Desk

ओमायक्रॉनवर मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता; लसीकरण वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

News Desk