HW News Marathi
महाराष्ट्र

‘उद्धव ठाकरेंकडे माथाडी कामगारांसाठी वेळ नाही’ नरेंद्र पाटलांनी शिवसेना सोडली !

नवी मुंबई | माथाडी कामगार नेते म्हणुन ओळखले जाणार शिवसेना नेते नरेंद्र पाटील यांनी अखेर आज शिवसेना सोडण्याचा आपला निर्णय जाहीर केला आहे. २०१९ च्या लोकसभेला नरेंद्र पाटील यांनी लोकसभेची निवडणूक सातारा मतदार संघातून उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शिवसेनेकडून लढवली होता.आज एका कार्यक्रमात नरेंद्र पाटील यांनी शिवसेना सोडण्याची घोषणा केलेली आहे.

नरेंद्र पाटलांनी शिवसेनेला रामराम का ठोकला ?

शिवसेना पक्षाला रामराम ठोकत असताना नरेंद्र पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. राज्यात महाविकासआघाडी सरकार येवून दीड वर्ष होत आले, तरी माथाडी कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोडवलेले नसल्याचं दु:ख त्यांनी बोलून दाखवलं आहे. मुख्यमंत्र्यांकडे बैठकीबाबत वेळ मागूनही ते भेटत नाहीत. यामुळे आपण शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला असल्याचे माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी जाहीर केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार !

News Desk

इंदोरीकर महाराजांनी वकिलामार्फत पीसीपीएनडीटी नोटीशीला दिले उत्तर

News Desk

लेखिका आणि कवयित्री कविता महाजन यांचे निधन

News Desk