HW News Marathi
महाराष्ट्र

माजी सैनिकांना घरपट्टी कर भरावा लागणार नाही, राज्य सरकारचा निर्णय!

मुंबई | आज (२९ ऑक्टोबर) राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठाकरे सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहे. राज्यातील सर्व माजी सैनिकांना व सैनिक विधवा पत्नींना दिवाळी आधीच भेट दिली आहे. राज्यातील सर्व माजी सैनिकांना या पुढे घरपट्टी व मालमत्ता कर भरावा लागणार नाही. राज्य सरकारने माजी सैनिकांसाठी बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नींना घराच्या मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १३ मार्च, २०२० रोजी विधानसभेत जाहीर केला होता. याच निर्णयाच्या अंमलबजावणीला आज समंती देण्यात आली आहे. या निर्णयाचा राज्यातील सुमारे अडीच लाख माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नींना लाभ होणार.

बैठकीतील महत्वाचे निर्णय –

१- मुदत संपलेल्या व कोरोना विषाणु संक्रमणामुळे निवडणूका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त प्रशासकांचा कालावधी वाढविणार. अध्यादेश काढण्यास मान्यता.

२- शिवभोजन थाळीचा दर दिनांक ०१ ऑक्टोबर २०२० पासून पुढील सहा महिन्यांसाठी पाच रुपये करण्यास मान्यता.

३- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील विद्युत शाखेचे बळकटीकरण करणार.

४- राज्यातील रायगड जिल्ह्यात प्रस्तावित बल्क ड्रग पार्क व औरंगाबाद ऑरिक सिटी येथे वैद्यकीय उपकरण पार्क प्रकल्पाकरिता विशेष प्रोत्साहने देण्यास मान्यता.

५- धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया रद्द. नव्याने निविदा मागविणार.

६- मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकार इमारतींच्या जलद पुनर्विकासकरिता नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive : लोकशाही विदाऊट मुख्यमंत्री आणि अध्यक्ष! – मुनगंटीवारांची सरकारवर टीका

Aprna

अमित शहांनी संपूर्ण भाषणात शिवसेना आणि उद्धव ठाकरे टार्गेट केले हेच आमचे यश – विनायक राऊत

News Desk

पुण्यामध्ये आर्थिक व्यवस्थेला दिशा देणारे संशोधन केंद्र उभारण्यात येणार! – चंद्रकांत पाटील

Aprna