HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडी सरकार तीन चाकी, मात्र स्टेअरिंग माझ्याच हातात !

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मॅरेथॉन मुलाखत घेतली. या मुलाखतीचा आजचा (२६ जुलै) दुसरा भाग प्रसिद्ध झाला. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. विरोधी पक्षाकडून वारंवार राज्यातील सरकार तीन चाकाचे आहे असे म्हटले जात असताना त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार तीनचाकी आहे. पण ही तिन्ही चाकं एकाच दिशेने चालत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थित काम करत असल्याचे स्पष्ट केले.

‘आमचे सरकार तीन चाकांचं असल्याची टीका होते. बरं तीन चाकं तर तीन चाकं. पण ती चालताहेत ना एका दिशेने? महाराष्ट्रात तीन चाकं तर केंद्रात किती चाकं आहेत? मी एनडीएत होतो तेव्हा ३०-३५ चाकांची रेल्वेगाडीच होती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.तसेच, सरकारी अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांचा वचक राहिला नसल्याच्या आरोपही उद्धव ठाकरे यांनी फेटाळून लावला.

अलीकडे अनेकांनी धारावी पॅटर्नचं कौतुक केले, सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून कौतुक झाले. हे काम नोकरशाहीने सरकराचं न ऐकता केले आहे का? निर्णय घेण्याचा अधिकार सरकारचा आहे हे मान्य. पण अंमलबजावणी सचिवांकडून करुन घ्यायची असते. शेवटी यंत्रणा राबवण्याची हिंमत तुमच्यात पाहिजे. प्रत्येक ठिकाणी ऑर्डरही तुम्ही देणार आणि कामही तुम्हीच करणार, हे गव्हर्नमेंट असू शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

याशिवाय, महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याच्या आरोपावरही उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्र्यांकडून झुकतं माप दिलं जातं, अशी तक्रार होती. पण मध्यंतरी झालेल्या भेटीनंतर तो प्रेमळ गैरसमज दूर झाला आहे. माझा शरद पवार यांच्याशी चांगला संवाद आहेच. पण मी कधीतरी सोनिया गांधी यांनाही फोन करतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे आघाडीचे सरकार उत्तम सुरू आहे असे मुखयमंत्र्यांनी देखील सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘105 असूनही सत्तेत नसल्याने कांड्या पेटवतायत’ अजित पवार भाजपवर बरसले

News Desk

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन केले जाणार 

News Desk

ठरलं! पावसाळी अधिवेशन २ दिवसांचं होणार

News Desk