HW News Marathi
महाराष्ट्र

हा माणूस मुख्यमंत्री पदाच्या लायक नाही – नारायण राणे

मुंबई | भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज (२६ ऑक्टोबर) काल दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर केलेल्या टीकेला आणि त्यांच्या भाषणाला उत्तर देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केल्याचे नारायण राणेंनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपण मुख्यमंत्री आहोत याचे भान तरी ठेवावे. आपण काय बोलतोय याकडे लक्ष असावे. तसेच, मुख्यमंत्री या पदाच्या लायकीचे नाही अशा शब्दांत उद्धव ठाकरेंवर नारायण राणेंनी प्रहार केला आहे.

“मी मुख्यमंत्री असताना अनेक नवे उद्योग आणले. मात्र कालच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी विकासाची कोणतीही घोषणा केली नाही. कोरोना, आर्थिक परिस्थिती यावर काहीही बोलले नाही. मुख्यमंत्र्यांनी जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी, अशा खड़तर शब्दांत मुख्यमंत्र्यांना सुनावले. इतकेच नव्हे, तर ठाकरे बेईमानी करुन मुख्यमंत्री झाले”, असा आरोपही यावेळी नारायण राणे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश, मुलींची सुटका

News Desk

“परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मराठवाड्यात या”, धनंजय मुंडेंची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भावनिक साद

Manasi Devkar

कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी मंजूर झाल्याची नितीन गडकरींची माहिती!

News Desk